मराठी बातम्या /बातम्या /देश /

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या 'जय विलास' पॅलेसमध्ये चोरी, पोलीस प्रशासनात खळबळ

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या 'जय विलास' पॅलेसमध्ये चोरी, पोलीस प्रशासनात खळबळ

भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार आणि ग्वाल्हेरचे महाराज ज्योतिरादित्य शिंदे  (Jyotiraditya Scindia) यांच्या ग्वाहलेरमधील  'जय विलास पॅलेस' (Jai Vilas Palace) चोरी झाल्याचं उघड झाले आहे.

  • Published by:  News18 Desk

ग्वाल्हेर, 18 मार्च : भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार आणि ग्वाल्हेरचे महाराज ज्योतिरादित्य शिंदे  (Jyotiraditya Scindia) यांच्या ग्वाल्हेरमधील 'जय विलास पॅलेस' (Jai Vilas Palace) मध्ये चोरी झाल्याचं उघड झाले आहे. आजवर सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या राजवाड्यात झालेल्या चोरीनं पोलीस प्रशासनामध्ये  (Police Administration)  खळबळ उडाली आहे. पोलिसांनी स्निफर डॉगच्या मदतीनं या चोरांचा तपास सुरु केला आहे.

ग्वाल्हेरचे पोलीस अधिक्षक रत्नेश तोमर यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार 'बुधवारी सकाळी गच्चीवरुन एक चोर राजवाड्यात शिरला होता, अशी सूचना रानी महलातून मिळाली. ही माहिती मिळताच तातडीने विशेष तुकडीसह पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम राजवाड्यात पाठवण्यात आली.'

पुरावे गोळा करण्याचे काम सुरु

पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने भाजपा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या जय विलास पॅलेसमध्ये जाऊन ज्या खोलीत चोरी झाली त्याची पाहणी केली. तसेच तेथील बोटांचे ठसे हस्तगत केले आहेत. राजवाड्यातून एक पंखा आणि सीपीयू चोरीला गेल्याची माहिती आहे.

का खास आहे जय विलास पॅलेज?

ग्वाहलेरचा जय विलास पॅलेज देशातच नाही तर संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. या पॅलेसला पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. श्रीमंत जयाजी राव शिंदे यांनी 1874 साली हा राजवाडा बांधला आहे. जवळपास 40 एकर परिसरात हा राजवाडा पसरला असून याची किंमत साधारण 4 हजार कोटी आहे.

(हे वाचा- Zomato डिलिव्हरी बॉयवर आरोप करणाऱ्या हितेशानं सोडलं बंगळुरू, काय आहे कारण?)

जिवाजी राव शिंदे यांनी 1964 साली राजवाड्यातील म्युझियमच्या भागाला सर्वांसाठी खुले केले. त्यानंतर ते पाहण्यासाठी इथे मोठी गर्दी होत असते. या राजवाड्यामध्ये 400 खोल्या असून शेकडो विदेशी कारागरांनी या बनवल्या आहेत. या खोल्यांच्या भिंतीवर सोने आणि चांदीचं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जय विलास पॅलेसमध्ये 3500 किलो वजनाचे दोन झुंबर लावण्यात आले आहेत. हे झुंबरही सर्वांच्या आकर्षणाचा बिंदू आहेत.

First published:

Tags: Crime news, Jyotiraditya scindia, Madhya pradesh, Mumbai police, Police commissioner