Home /News /national /

Zomato डिलिव्हरी बॉयवर आरोप करणाऱ्या हितेशानं सोडलं बंगळुरू, काय आहे कारण?

Zomato डिलिव्हरी बॉयवर आरोप करणाऱ्या हितेशानं सोडलं बंगळुरू, काय आहे कारण?

झोमॅटो डिलिव्हरी बॉय (Zomato Delivery Boy) आणि बंगळुरूमधील महिला ग्राहकामधील मारहाण प्रकरणात आता आणखी एक नवं वळण आलं आहे. झोमॅटो बॉयवर आरोप करणारी हितेशा चंद्राणी (Hitesha Chandranee) हिनं आता बंगळुरू सोडलं आहे.

    बंगळुरू 18 मार्च : झोमॅटो डिलिव्हरी बॉय (Zomato Delivery Boy) आणि बंगळुरूमधील महिला ग्राहकामधील मारहाण प्रकरणात आता आणखी एक नवं वळण आलं आहे. याप्रकरणी झोमॅटो बॉयवर आरोप करणारी मुलगी हितेशा चंद्राणी (Hitesha Chandranee) हिनं आता बंगळुरू सोडलं आहे. हितेशानं सोशल मीडियावर तिच्या घराचा पत्ता लीक झाल्यानं सुरक्षेच्या कारणामुळं हा निर्णय घेतला आहे. हितेशानं इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत असा आरोप केला होता, की ऑर्डर घेण्यास नकार दिल्यानं डिलिव्हरी बॉयनं तिच्यावर हल्ला केला होता. या कारणामुळे सोडलं बंगळुरू - द न्यूज मिनटच्या रिपोर्टनुसार, बंगळुरू इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस ठाण्याचे पोलीस अनिल कुमार म्हणाले, की जेव्हा आम्ही तिच्या घरी गेलो, तेव्हा कोणीच दरवाजा उघडला नाही. एका दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, की हितेशाला बंगळुरूमध्ये राहाण्याची भीती वाटत होती, की लोक एफआयआरबद्दल विचारपूस करण्यासाठी तिच्या घरी येऊ शकत होते. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही व्हिडीओ शेअर होत आहेत, यात हितेशाच्या बंगळुरूमधील घराचा पत्ता सांगितला जात आहे. डिलिव्हरी बॉयनं हितेशाविरोधात केली तक्रार - याआधीच झोमॅटो डिलिव्हरी बॉय कामराजच्या तक्रारीनुसार हितेशाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. कामराजच्या तक्रारीनुसाक. बंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस ठाण्यात हितेशाच्या विरोधात आयपीसी कलम 355 (हल्ला), 504 (अपमान) आणि 506 (धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, हितेशानं केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी कामराजला अटक केलं आहे. काय आहे प्रकरण - ऑर्डर उशिरा (order delay) आल्याच्या वादातून झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने (Zomato delivery boy) आपल्याला मारहाण केली असा दावा बंगळुरुतील हितेशा चंद्राणी (Hitesha Chandranee) या महिलेनं केला होता. या महिलेनं रक्तबंबाळ अवस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. कामराजने दिलेल्या जबानीमध्ये त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. हितेशा चंद्राणी यांच्या घरी मी उशिरा पोहचलो. खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे मी उशिरा पोहचलो असं सांगून त्यांची माफी मागितली. त्यांनी (हितेशा) कॅश ऑन डिलिव्हरी (cash on delivery) हा पर्याय निवडल्याने मी त्यांच्याकडे पैसे देण्याची मागणी केली. मात्र त्यावेळी हितेशा यांनी जेवण ताब्यात घेतलं, पण आपण कस्टमर सपोर्टशी बोलत असल्याचं सांगून पैसे देण्यास नकार दिला,' असं कामराज यांनी सांगितलं. 'त्यानंतर हितेशा अचानक जोरात ओरडायला आणि शिव्या द्यायला लागल्या. कस्टमर सपोर्टने मला ऑर्डर कॅन्सल झाल्याचं सांगून पार्सल परत घेण्याची सूचना केली होती. त्यांनी पार्सल देण्यास नकार दिला. मी त्या ठिकाणचं एकूण वातावरण पाहून पार्सल न घेता परत जाण्याचं ठरवलं,' असा अनुभव कामराजने सांगितला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Zomato

    पुढील बातम्या