मराठी बातम्या /बातम्या /देश /

'मी कटूता विसरले आहे, कारण...'; MIM कडून विजयी झालेल्या हिंदू महिला उमेदवाराची प्रतिक्रिया

'मी कटूता विसरले आहे, कारण...'; MIM कडून विजयी झालेल्या हिंदू महिला उमेदवाराची प्रतिक्रिया

 भाजपच्या सुनीता गांगले, काँग्रेसच्या शिल्पा सोनी रिंगणात होत्या. या सर्वांपेक्षा जास्त अरुणा यांना 643 मते मिळाली

भाजपच्या सुनीता गांगले, काँग्रेसच्या शिल्पा सोनी रिंगणात होत्या. या सर्वांपेक्षा जास्त अरुणा यांना 643 मते मिळाली

भाजपच्या सुनीता गांगले, काँग्रेसच्या शिल्पा सोनी रिंगणात होत्या. या सर्वांपेक्षा जास्त अरुणा यांना 643 मते मिळाली

भोपाळ, 21 जुलै : मध्य प्रदेशमधील (MP) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एमआयएमने बाजी मारली आहे.  खरगोन येथील नगरपालिका निवडणुकीत असादुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. ओवेसी यांच्या पक्षाचे मध्य प्रदेशात पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण सात नगरसेवक निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, एमआयएमकडून महिला हिंदू उमेदवार विजयी झाल्या आहेत.

खरगोन नगरपालिकेत अरुणा उपाध्याय (Aruna Upadhyay) यांच्यासह एआयएमआयएमचे (AIMIM) तीन नगरसेवक निवडून आले आहेत. खरगोन नगरपालिकेच्या 33 पैकी 19 वॉर्डांत भाजपने विजय मिळवला असून, काँग्रेसला फक्त 4 जागा जिंकता आल्या. या निवडणुकीत सात अपक्षही विजयी झाले आहेत. दुसरीकडे,  ओवेसी यांच्या पक्षाने पहिल्या टप्प्यात जबलपूरमधून दोन आणि खांडवा आणि बुऱ्हाणपूरमधून प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला आहे. म्हणजेच ओवेसी यांच्या पक्षाचे मध्य प्रदेशात पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण सात नगरसेवक निवडून आले आहेत. खरगोनमध्ये तीन विजयी उमेदवारांपैकी एक अरुणा उपाध्याय यांचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. आपण हिंदू-मुस्लिम हा भेद मानत नसल्याचं अरुणा म्हणाल्या आहेत. या संदर्भात जनसत्ताने वृत्त दिलंय.

(व्यापारी-व्यावसायिक उगीच नाहीत चांदीचा हत्ती टेबलावर ठेवत; असे आहेत त्याचे फायदे)

वॉर्ड क्रमांक-2 मध्ये अरुणा यांच्यासमोर भाजपच्या सुनीता गांगले, काँग्रेसच्या शिल्पा सोनी रिंगणात होत्या. या सर्वांपेक्षा जास्त अरुणा यांना 643 मते मिळाली. तर, भाजपच्या सुनीता यांना 612, काँग्रेसच्या शिल्पा सोनींना 458 मतं मिळाली. अरुणा 31 मतांनी विजयी झाल्या. खरगोनच्या वॉर्ड नंबर 2 मध्ये एकूण 2915 मतदार असून, तिथली 70 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे.

या विजयावर अरुणा उपाध्याय म्हणाल्या की, 'माझ्यासाठी जनतेची सेवा करणं हा महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. त्यामुळेच मी AIMIM पक्षात आले. मी हिंदू (Hindu) आणि मुस्लिम (Muslim) या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, कारण सर्वचजण माणसं आहेत. सर्वांनी एकत्र राहावं, हेच सर्वांसाठी चांगलंय. माझ्यासमोर निवडणुकीदरम्यान अनेक आव्हानं होती; पण मला लोकांचं खूप प्रेमही मिळालं. त्यामुळे मी ती आव्हानं पार करू शकले आणि त्यातली कटूता विसरले आहे. मला आशा आहे की मला भविष्यातही प्रेम मिळत राहिल. मी अद्याप खासदार ओवेसी यांच्याशी बोलले नाही, पण लवकरच त्यांच्याशी बोलणार आहे.’ बारावीपर्यंत शिकलेल्या अरुणा यांना पती श्यामलाल यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवण्याची प्रेरणा दिली होती.

(पीएम किसानचे सर्व्हर डाऊन लाखो शेतकऱ्यांना नाहक त्रासामुळे नाराजी)

एमआयएमआयएमचे शहराध्यक्ष सरफराज खान यांनी या विजयानंतर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘ही बदलाची सुरुवात आहे. जनता भाजप (BJP) आणि काँग्रेसवर (Congress) नाराज आहे. आम्ही परिसरातील समस्या जाणून घेतल्या आहेत आणि लवकरच त्यावर आम्ही काम करू.’

नगरसेवकांच्या विजयानंतर खासदार ओवेसी यांनी ट्विट केलंय. ट्विटमध्ये ते म्हणाले, 'खरगोनच्या 7 उमेदवारांनी नगरपालिका निवडणुकीत विजय मिळवला आहे. खरगोनच्या जनतेने आमच्यावर विश्वास दाखवून मत दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. खरगोनच्या जनतेने द्वेषाचे राजकारण नाकारले आणि आमच्या उमेदवार अरुणा उपाध्याय यांना विजयी केलं. आम्ही अरुणाजींचे आभार मानतो. त्यांच्या विजयाने खऱ्या अर्थाने खरगोनमध्ये धर्मनिरपेक्षता आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचं उदाहरण प्रस्थापित केलं आहे.’

याशिवाय AIMIM ने सिंगरौली महापालिकेतील नगराध्यक्षपद भाजपकडून हिसकावून घेतलं असून, पक्षाने जबलपूर, बऱ्हाणनपूर, खंडवा आणि खरगोनमध्ये अनेक नगरसेवकपदे जिंकली आहेत.

First published: