मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /PM Kisan Server Down : पीएम किसानचे सर्व्हर डाऊन लाखो शेतकऱ्यांना नाहक त्रास, फेऱ्या माराव्या लागत असल्याने शेतकऱ्यांचा संताप

PM Kisan Server Down : पीएम किसानचे सर्व्हर डाऊन लाखो शेतकऱ्यांना नाहक त्रास, फेऱ्या माराव्या लागत असल्याने शेतकऱ्यांचा संताप

ई केवायसी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या निराशा पदरी पडत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने सांगली आणि जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

ई केवायसी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या निराशा पदरी पडत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने सांगली आणि जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

ई केवायसी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या निराशा पदरी पडत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने सांगली आणि जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 जुलै : देशभरातील कोट्यावधी शेतकरी किसान सन्मान योजनेचा लाभ घेतात दरम्यान मागच्या काही महिन्यात किसान सन्मान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नव्हते. यासंदर्भात आता शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याची तारीख 31 मे होती ती वाढवण्यात आली आहे. परंतु काही ई केवायसी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या निराशा पदरी पडत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने सांगली आणि जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. (PM Kisan Server Down)

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 'ई-केवायसी' करण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र आठ दिवसांपासून सर्व्हर डाउन असल्यामुळे शेतकन्यांवर ई-सेवा केंद्रांवर फेऱ्या मारण्याची वेळ आली आहे. ई-केवायसी व नवीन नोंदीही करता येत नाही. ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. सांगली आणि जळगाव जिल्ह्यातील तब्बल सव्वा लाखावर शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही.

हे ही वाचा : मुंबईत कोरोनापाठोपाठ आता नवं संकट; स्वाईन फ्लूने काढलं डोकं वर, 4 रुग्ण गंभीर

केंद्राने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली. त्या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येतात. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा सरसकट शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु लोकप्रतिनिधी, शासकीय नोकरदार आणि प्राप्तिकर भरणाऱ्यांना या योजनेतून वगळले आहे. जिल्ह्यातील ४ लाख ३६ हजार ५८४ नोंदणीकृत लाभार्थीपैकी २ लाख ४२ हजार ३७ जणांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. तर १ लाख ९४ हजार ५४७ लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना जुलैअखेर 'ई-केवायसी' पूर्ण करावी लागणार आहे.

ओटीपी किंवा बायोमेट्रिक पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी आजअखेर एकूण ४ लाख ९८ हजार ८० शेतकऱ्यांपैकी केवळ २ लाख ९८ हजार ६२३ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. उर्वरित २ लाख ७९ हजार ४५७ ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहेत. तरी या लाभार्थ्यांनी तत्काळ आपले ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले.

पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी ३१ मे ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. जर एखाद्या शेतकऱ्याने ई-केवायसी केले नाही तर पीएम किसानद्वारे देण्यात येणारे त्यांच्या खात्यात जमा होणार नाहीत अशा परिस्थितीत, pmkisan-ict@gov.in शेतकरी वेबसाइटद्वारे ई-केवायसी करू शकतो.

हप्ता न मिळाल्यास यावर करा संपर्क 

पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266

पीएम किसान हेल्पलाईन नंबर:155261

पीएम किसान लँडलाईन नंबर्स: 011—23381092, 23382401

पीएम किसानचे अपडेट केलेले हेल्पलाईन नंबर: 011-24300606

पीएम किसान हेल्पलाईन: 0120-6025109

ई-मेल आईडी: pmkisan-ict@gov.in

पीएम किसानचे पैसे जमा झाले की नाहीत असे तपासा

सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.

हे ही वाचा : एकनाथ शिंदेंचा मलाही फोन आला होता, सेनेचे आमदार अंबादास दानवेंचा गौप्यस्फोट

यानंतर 'Farmers Corner' या ऑप्शनवर क्लिक करा.

त्यानंतर Beneficiary Status क्लिक करा.

आता तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाका.

त्यानंतर 'Get Report' पर्यायावर क्लिक केल्यावर संपूर्ण यादी उघडेल.

या यादीमध्ये तुम्ही तुमच्या हप्त्याचे तपशील पाहू शकता.

First published:
top videos

    Tags: Agriculture, Farmer, PM Kisan