Home /News /national /

मुलाला चावल्याचा बापाला आला राग,डॉक्टरनं केली कुत्र्याची निर्घृण हत्या; चाकूनं केले वार

मुलाला चावल्याचा बापाला आला राग,डॉक्टरनं केली कुत्र्याची निर्घृण हत्या; चाकूनं केले वार

(Photo Credit- tv9hindi)

(Photo Credit- tv9hindi)

या व्हिडीओमध्‍ये एक डॉक्टर कुत्र्यासोबत निर्दयपणे वार करताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

    मध्य प्रदेश, 30 नोव्हेंबर: ग्वाल्हेर (Madhya Pradesh, Gwalior) येथील डबरा तहसीलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (viral video social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्‍ये एक डॉक्टर कुत्र्यासोबत निर्दयपणे वार करताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हा डॉक्टर चाकू घेऊन कुत्र्यावर वार करताना दिसत आहे. ज्या कुत्र्याला ती व्यक्ती चाकूनं मारताना दिसत आहे, तो कुत्रा त्याच्या मुलाचा चावला होता. डॉक्टरांनी आधी कुत्र्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर त्याच्यावर चाकूने अनेक वार केले. सिमरिया येथील हा बंगाली लबाड डॉक्टर झुडपात चाकू घेऊन कुत्र्यावर वार करताना दिसत आहे. त्याने एका हातानं कुत्र्याचा पाय धरला आहे आणि दुसऱ्या हातानं त्याच्यावर चाकूनं वार करत आहे. हेही वाचा- बर्थडेला नेलं अन् पतीनं केलं पत्नीला मित्रांच्या हवाली, सामूहिक अत्याचाराच्या घटनेनं हादरली मुंबई रक्ताळलेला कुत्रा धारदार चाकूच्या हल्ल्याने ओरडत पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण निर्दयी डॉक्टर त्याला त्याच्या तावडीतून बाहेर पडू देत नाहीत. 23 सेकंदाच्या व्हिडीओमध्‍ये कडॉक्टरची क्रूरता पाहून सर्वजण हळहळ व्यक्त करत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण 10 दिवसांपूर्वी या डॉक्टरच्या मुलाला या भटक्या कुत्र्यानं चावा घेतला होता. जखम फारशी गंभीर नव्हती. यावर बंगाली डॉक्टर खूप संतापला. तो रात्रंदिवस या कुत्र्याचा शोध घेत होता. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी त्याला गावातील सरकारी शाळेच्या मागे हा भटका कुत्रा दिसला. यानंतर त्याने त्याला पकडून त्याच्या मानेवर पाय टाकला आणि त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. श्वानप्रेमींकडून कारवाईची मागणी कुत्र्याला पकडल्यानंतर बंगाली डॉक्टरनं त्याला मारहाण केली आणि तो अर्धमेला असताना त्याला चाकूने कापण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांनी बंगाली डॉक्टरच्या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. हेही वाचा- Facebook वरून टाकलं जाळं, विधवा महिलेला हरिद्वारला बोलावून केला भयावह प्रकार याप्रकरणी श्वानप्रेमी छाया तोमर यांनी ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे म्हटले आहे. असा क्रूरपणा दाखविणाऱ्या डॉक्टरवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. छाया तोमर यांनी सांगितले कं, ती लवकरच त्यांच्या संस्थेशी संपर्क साधून याप्रकरणी तक्रार करणार आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Madhya pradesh

    पुढील बातम्या