Home /News /national /

Facebook वर केली मैत्री, विधवा महिलेला हरिद्वारला बोलावून केलं दुष्कर्म

Facebook वर केली मैत्री, विधवा महिलेला हरिद्वारला बोलावून केलं दुष्कर्म

फेसबुकवर (Facebook) माझी मैत्री हरिद्वार येथे राहणाऱ्या तरुणासोबत झाली. त्यानं मला मध्यप्रदेशाहून बोलावून घेतलं.

    उत्तराखंड, 30 नोव्हेंबर: उत्तराखंडमधील (Uttarakhand Crime) हरिद्वारमध्ये (Haridwar)महिलेनं एका व्यक्तीवर बलात्काराचा आरोप केला आहे. फेसबुकवर (Facebook) माझी मैत्री हरिद्वार येथे राहणाऱ्या तरुणासोबत झाली आणि त्यानं मध्यप्रदेशाहून बोलावून माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप महिलेनं केला आहे. पोलिसांनी देवबंद सहारनपूर येथील रहिवाशी असलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु केला आहे. महिलेच्या पतीचा मृत्यू झाला असून या तरुणानं तिच्याशी लग्न करण्याचं आश्वासन देऊन हरिद्वारमध्ये तिच्यावर बलात्कार केला. हेही वाचा- जगभरात झपाट्यानं पसरतोय Omicron variant, जाणून घ्या आतापर्यंत किती आढळले रुग्ण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील नरसिंहगड येथे राहणाऱ्या एका महिलेनं तक्रार दिली आहे. पीडित महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे की, 2020 मध्ये फेसबुकवर तिची सहारनपूरच्या देवबंद शहरातील रहिवासी संदीप गिरीशी मैत्री झाली आणि संदीपनं स्वत: अविवाहित असल्याचं सांगितलं होतं. महिलेचं म्हणणं आहे की, जेव्हा फेसबुकवर मैत्री झाली तेव्हा दोघेही फेसबूक मेसेंजरवर बोलू लागले आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांशी मोबाईल नंबर शेअर केला. यानंतर मोबाईलवर दोघांचं बोलणं सुरु झालं. पीडित महिलेच्या पतीचा मृत्यू झाल आहे आणि संदिपनं स्वतः अविवाहित असल्याचं सांगितलं होतं. तसंच त्यानं मला लग्न करण्याचं वचन दिलं होतं, असं महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. हॉटेलमध्ये नेऊन केला बलात्कार महिलेनं पोलिसांना सांगितलं की, संदीपनं तिला आमिष दाखवून 25 नोव्हेंबरला हरिद्वारला बोलावलं. संदीप मला हरिद्वार रेल्वे स्थानकावर भेटला. त्यानंतर एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. 26 नोव्हेंबर रोजी मला एकटीला सोडून पळून गेला. हेही वाचा- जबरदस्त! आफ्रिकन देशांचा 'रक्षक' बनला भारत देश, अशी करणार मदत या प्रकरानंतर पीडित महिला आरोपीच्या घरी पोहोचली. घरी गेल्यावर समजलं की, त्याचं लग्न झालं होतं. जेव्हा महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली तेव्हा तिला हरिद्वारमध्ये तक्रार नोंदवण्यास सांगितलं. महिलेनं हरिद्वार गाठून शहर कोतवालीमध्ये तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून संदीप रा.देवबंद, सहारनपूर, उत्तर प्रदेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Madhya pradesh, Rape, Rape accussed, Uttarakhand

    पुढील बातम्या