देशाची राजधानी दिल्लीत, मोठ्या प्रमाणात कोकीनसह एका विदेश महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. कस्टम विभागाने रविवारी दिल्ली विमानतळावरून परदेशी प्रवाशाला अटक केली आहे. प्रवाशाकडून जप्त करण्यात आलेल्या कोकीनची किंमत जवळपास 6 कोटी रुपये असल्याचं कस्टम विभागाकडून सांगण्यात आलं आहे. विदेशी प्रवासी, टांझानियाच्या अदिस अबाबाहून दिल्लीकडे येत असल्याची माहिती आहे. कस्टम विभागाकडून त्याला विमानतळावरच अटक करण्यात आली. (प्रतिकात्मक फोटो- न्यूज18 हिंदी)
पोलीस उपायुक्त (रेल्वे) हरेंद्र कुमार सिंह यांनी सांगितलं की, शनिवारी संशयास्पद हालचालींमुळे एका महिलेला थांबवण्यात आलं आणि तिच्याकडे असलेल्या ज्यूटच्या 12 बॅगची तपासणी करण्यात आली. त्या बॅगमध्ये बीयरचे 840 कॅन होते. महिला ट्रेनमधून, मुंबईहून दिल्लीत आली होती. तिच्याकडचे बीयरचे कॅन बेकायदेशीरपणे देशात आणले गेले आणि त्यानंतर मुंबईहून दिल्लीत विक्रीसाठी आणले जात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मरियम एनी एडाकवो असं अटक करण्यात आलेल्या विवाहित महिलेचं नाव असून तिला तीन मुलं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती नायजेरियाई पोलीस दलात आहे आणि ही महिला 2011 पासून भारतात येते. ती कपड्यांच्या व्यवसायासंदर्भात फेब्रुवारीमध्ये भारतात आली होती. ती मुंबईत राहत होती. तिच्याकडून जप्त करण्यात आलेल्या बीयर अफ्रिकी लोकांमध्ये लोकप्रिय असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
याआधी शुक्रवारीही दिल्ली रेल्वे पोलिसांनी एका संशयास्पद हालचाली असलेल्या सोन्याची तस्करी करणाऱ्यालाही अटक केली होती. त्याच्याकडून 6.29 किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं. त्या सोन्याची किंमत जवळपास सव्वा तीन कोटी होती. तो ट्रेनमधून सोन्याचं पार्सल पोहचवण्यासाठी मुंबईत येत होता. आरोपी विमानतळावर पकडले जाऊ नये, यासाठी ट्रेनमधून प्रवास करतात.