नवऱ्याने दुसरं लग्न केल्याने बायकोचा जळफळाट; सवतीला पेट्रोल टाकून जाळणार इतक्यात...

नागपूरमध्ये सवती मत्सरामुळे एक महिलेनं अतिशय टोकाचं पाऊल उचललं आहे. आपल्या सवतीला पेट्रोल टाकून जाळण्याचा तिने प्रयत्न केला.

नागपूरमध्ये सवती मत्सरामुळे एक महिलेनं अतिशय टोकाचं पाऊल उचललं आहे. आपल्या सवतीला पेट्रोल टाकून जाळण्याचा तिने प्रयत्न केला.

  • Share this:
    नागपूर, 22 नोव्हेंबर: नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोला मत्सरापायी एका महिलेनं जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. नागपूरच्या शांतीनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत महिलेला वाचवले. काय घडला प्रकार? सविता सव्वालाखे आणि विनोद सव्वालाखे यांचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. हे दोघंही नागपूरच्या शांतीनगरमध्ये वास्तव्याला आहेत. विनोदचा पॅकेजिंगचा व्यवसाय आहे. पीडित महिला ही विधवा असून ती विनोदकडे कामाला होती. एकत्र काम करत असताना त्यांचे प्रेमसंबंध जुळले. धक्कादायक बाब म्हणजे विनोदने मार्च 2020 मध्ये आपल्या पत्नी आणि मुलांना अंधारात ठेऊन पीडित महिलेसोबत लग्न केलं. काही दिवसांनी हा सगळा प्रकार सविताला समजला. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. विनोद आणि सवितामध्ये वाद वाढू लागले. या दोघींचं समुपदेशन करण्यासाठी त्यांना भरोसा सेलमध्ये आणण्यात आलं होतं. दोघी जणी सेलच्या आवारात बसलेल्या असताना अचानक सविताने कुठूनतरी पेट्रोलची बाटली आणून पीडित महिलेच्या अंगावर ओतली. आणि तिने स्वत:कडे लपवून ठेवलेली माचिस पेटवून पीडित महिलेच्या अंगावर फेकणार इतक्यात तिथे असलेल्या महिला पोलिसांनी सविताला घट्ट पकडून ठेवलं. पीडित महिलेच्या अंगावर पाणी ओतण्यात आलं. आणि तिची सुरक्षाही वाढवण्यात आली. घडलेल्या घटनेमुळे पीडित महिला प्रचंड घाबरली होती. सविताला पकडून पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तिथे गेल्यावरही ती शांत होण्याचं नाव घेत नव्हती. सवतीला चांगलाच धडा शिकवेन, तिला सोडणार नाही असा तिचा थयथयाट सुरूच होता. दरम्यान ज्या महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न सविताने तिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे शांतीनगर परिसरात खळबळ माजली आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published: