चेन्नई 11 एप्रिल : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार असलेल्या माधव राव (Madhava Rao) यांचं निधन झालं आहे. त्यांना कोरोनाची (Coronavirus)लागण झाली होती, असं सांगितलं जात आहे. राव श्रीविल्लिपुथूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. 63 वर्षीय राव यांना कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर 20 मार्चला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या फुफ्फुसातही इन्फेक्शन झालं होतं. तमिळनाडूतील 234 विधानसभेच्या जागांसाठी सहा एप्रिलला मतदान झालं. इथे केवळ एकाच टप्प्यात मतदान पार पडलं.
मिळालेल्या माहितीनुसार, माधव राव नोमिनेशन फाइल केल्यानंतर दोन दिवसातच आजारी पडले. त्यामुळे, ते निवडणुकीचा प्रचारही करू शकले नाहीत. त्यांना मुदुरैमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते आजारी असल्यामुळे निवडणुकीदरम्यान प्रचाराची जबाबदारी त्यांची मुलगी दिव्या राव हिनं सांभाळली. म्हटलं जात आहे, की नंतर हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं.
कूचबिहारमध्ये जाण्यापासून ममतांना EC ने रोखलं, 4 ग्रामस्थांच्या मृत्यूनंतर खळबळ
राव हे एका व्यावसायिकाशिवाय कायदेशीर सल्लागारही होते आणि त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये वेगवेगळी पदेही भूषविली आहेत. ते तामिळनाडू काँग्रेसमधील प्रदेश काँग्रेस कमिटीचे (पीसीसी) सक्रिय सदस्य होते. आता माधवराव निवडणूक जिंकल्यास श्रीविलीपुथूर सीटवर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.
We are shocked to hear about the passing away of l Shri Madhavrao, candidate of @INCTamilNadu from Srivilliputhur. On behalf of @TamilNaduPMC we extend our deepest condolences with the family of the bereaved. May his soul Rest In Peace. pic.twitter.com/bZx1dWkRkB
— Tamil Nadu Pradesh Mahila Congress (@TamilNaduPMC) April 11, 2021
तमिळनाडूमध्ये शनिवारी 5,989 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 9,26,816 वर पोहोचली आहे. राज्यात शनिवारी कोरोनामुळे 23 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर एकूण मृतांची संख्या 12,886 वर पोहोचली आहे. तर, शनिवारी 1,952 जण कोरोनामुक्त झाले आहेत. चेन्नईमध्ये सर्वाधिक 1,977 नवीन रुग्ण आढळले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Tamil nadu, Tamil nadu Election