जाहिरात
मराठी बातम्या / देश / '4 दिवस बाकी, जे करायचं ते करून घ्या'; CM योगी आदित्यनाथ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

'4 दिवस बाकी, जे करायचं ते करून घ्या'; CM योगी आदित्यनाथ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

'4 दिवस बाकी, जे करायचं ते करून घ्या'; CM योगी आदित्यनाथ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Lucknow News: उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपात्कालीन सेवांसाठी असणाऱ्या 112 च्या WhatsApp क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे, अशी माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ, 04 मे: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची (Death Threat to UP CM) धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.  उत्तर प्रदेश पोलिसांनी जारी केलेल्या आपात्कालीन साहाय्यासाठीच्या 112 या WhatsApp क्रमांकावर मेसेज पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. ही पहिली वेळ नाही आहे की, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना अशी धमकी मिळते आहे. त्यामुळे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल केला आहे. या प्रकरणी ज्या क्रमांकावरून धमकी आली होती त्याबाबत तपास सुरू आहे आणि आरोपीचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 29 एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारासा उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपात्कालीन सेवांसाठी असणाऱ्या 112 च्या WhatsApp क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे. या धमकीमध्ये असं म्हटलं होतं की, मुख्यमंत्र्यांकडे केवेळ 4 दिवस शिल्लक आहेत. या 4 दिवसात माझं काय करायचं ते करा, पाचव्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा जीव घेतला जाईल. (हे वाचा- सामान्यांना झटका! प. बंगाल निकालानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत उसळी ) आरोपीच्या शोधात UP पोलीस धमकीच्या मेसेजनंतर पोलीस विभागात (UP Police) खळबळ उडाली होती. अशाप्रकारे थेट मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्या या क्रमांकाची तपासणी करण्यासाठी सर्व्हिलान्स टीम तैनात करण्यात आली आहे. लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटीमध्ये कंट्रोल रूम डायल 112 चे ऑपरेशन कमांडर अंजुल कुमार यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले आहे. पोलिसांचं हे पथक सर्व्हिलान्स टीमच्या मदतीने आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात