प्रियकराने पहाटे 4 वाजता केली 'सेक्स'ची मागणी, प्रेयसीने पेटवलं त्याचं घर!

प्रियकराच्या 'सेक्स' कॉलनंतर धुंद अवस्थेत ती प्रियकराच्या घरी आली. मात्र तिची निराशा झाली...

News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2019 06:52 PM IST

प्रियकराने पहाटे 4 वाजता केली 'सेक्स'ची मागणी, प्रेयसीने पेटवलं त्याचं घर!

न्यू जर्सी, 21 ऑगस्ट : प्रेयसी आणि प्रियकराच्या रोमॅन्टीक नात्याबद्दल कायम लिहिलं जातं. पण एका प्रेयसीने रागाच्या भरात ज्याच्यावर जीव लावला त्याचच घरच पेटविल्याची धक्कादायक घटना अमेरिकेत घडलीय. न्यू जर्सी इथं राहणाऱ्या एका प्रेमी युगलाची ही अघोरी प्रेमकहाणी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. प्रियकराने आपल्या प्रेयसीला फोन करून 'सेक्स' करण्याची इच्छा व्यक्त केली आणि सकाळी 4 वाजता आपल्या घरी ये असं सांगितलं. प्रेयसी जेव्हा घरी आली तेव्हा तो झोपलेला आढळला. तेव्हा रागाने तिने त्याचं घरच पेटवून दिलं.

टेईज रस्सेल असं त्या आक्रमक तरुणीचं नाव आहे.  29 वर्षांच्या या तरुणीचं एका तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. ते दोघही एकाच शहरात मात्र वेगवेगळे राहत होते. प्रियकराच्या 'सेक्स'कॉलनंतर धुंद अवस्थेत ती प्रियकराच्या घरी आली. घरी आल्यानंतर तो आपल्याला कुशीत घेऊन स्वागत करेल अशी तिची समजूत होती. मात्र त्याच्या घरी आल्यानंतर तिला धक्का बसला. कारण त्यावेळी तो गाढ झोपलेला होता.

आलिया-रणबीर आणि वरुण-नताशाच्या लग्नात ही व्यक्ती निभावणार मोठी भूमिका

'सेक्स'साठी घरी बोलावूनही तो गाढ झोपेत असल्याने टेईजचा मुडच गेला. रागाने ती बाहेर आली आणि जवळच्या पेट्रोल पंपावरून तिने पेट्रोल आणलं आणि प्रियकराच्या घरावर टाकून आग लावली. पेट्रोल टाकून आग लावल्याने घर पेटलं. घरात धूर झाल्याने तो उठला तेव्हा त्याला आग लागल्याचं लक्षात आलं.

'या' गोष्टीसाठी पत्नीची जुगारात लावली बोली, पण हरला डाव; मग...

Loading...

त्याने घरात एवढा धूर झाला होता की त्याला पूर्ण कपडेही घातला आले नाहीत. बनियान आणि अंडरपॅण्टवरच तो बाहेर आला आणि त्याने फायरब्रिगडला फोन केला तोपर्यंत त्याच्या घराचा पुढचा भाग जळून गेला होता. नंतर त्याने त्याच अवस्थेत पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली तेव्हा सगळा खुलासा झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: love
First Published: Aug 21, 2019 03:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...