मुंबई, 21 ऑगस्ट : मागच्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये अनेक बॉलिवूड कलाकर लग्नाच्या बेडीत अडकले. एकीकडे रणवीर-दीपिकानं इटलीच्या लेक कोमो येथे सात फेरे घेतले. तर अभिनेत्री प्रियांका चोप्रानं जोधपूरच्या उमेद भवनमध्ये अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केलं. मागच्या वर्षी प्रमाणे या वर्षीही बॉलिवूडमधील काही जोड्या लग्नाच्या बंधनात अडकण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्स नुसार यावर्षी वरुण धवन-नताशा दलाल आणि आलिया भट-रणबीर कपूर लग्नाच्या बेडीत अडकतील आणि त्यांच्या लग्नात निर्माता करण जोहर महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याच समजतं. स्पॉटबॉयनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या दोन्ही लग्नांमध्ये वर-वधू त्यांच्या संगीत सेरेमनीमध्ये करण जोहरच्या ब्रँडची ज्वेलरी घालणार आहेत. करण जोहरनंच आलिया आणि वरुणला त्याच्या ‘स्टूडंट ऑफ द इयर’ मधून बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं होतं. मागच्या बऱ्याच काळापासून या दोघांच्याही लग्नाबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. त्यानंतर आता या वर्षाच्या अखेर पर्यंत हे दोन्ही कलाकार आपापल्या पार्टनरसोबत लग्न करणार असल्याचं बोललं जातंय. सलमान खानच्या अभिनेत्रीनं मादक अदांनी केलं घायाळ, BOLD फोटोशूट VIRAL सूत्रांच्या माहितीनुसार वरुण धवन त्याची बालमैत्रीण आणि गर्लफ्रेंड नताशा दलालशी डिसेंबरमध्ये लग्न करु शकतो. तर दुसरीकडे रणबीर कपूर आणि आलिया भट सुद्धा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. वेडिंग वेन्यू बद्दल बोलायचं तर हे दोन्ही कपल जोधपूरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा आहे. यासाठी दोन महाल बुक करण्याबाबत चर्चा सुरू आहे. या दोघांच्या लग्नाची तयारी प्रियांका चोप्राचे वेडिंग प्लानर मोटवानी एंटरटेनमेन्ट अँड वेडिंग हेच सांभाळणार आहेत. तीन दिवसाच्या या वेडिंग इव्हेंटमध्ये वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत आणि याबाबच्या काही गोष्टी ठरवणं अद्याप बाकी आहे. त्यानंतर या दोन्ही कपलच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. Sacred Games-2 मुळे उडाली यूएईतल्या ‘या’ व्यक्तीची झोप, वाचा कारण अभिनेत्री कतरिना कैफशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूर आणि आलिया भट रिलेशनमध्ये आले. आलियाला खूप आधीपासून रणबीर आवडतो. यांच्या अफेअरच्या चर्चा काही दिवस चालल्या त्यानंतर या दोघांनीही त्यांचं नातं ऑफिशिअल केलं होतं. स्क्रीनवर फिट दिसणाऱ्या बिग बी यांचं लीव्हर 75 टक्के खराब, TB शी झुंज सुरू ======================================================================= VIDEO: हिना पांचाळला आता हिंदी बिग बॉसचे वेध? पाहा EXCLUSIVE मुलाखत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.