जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'या' गोष्टीसाठी पत्नीची जुगारात लावली बोली, पण हरला डाव; मग...

'या' गोष्टीसाठी पत्नीची जुगारात लावली बोली, पण हरला डाव; मग...

'या' गोष्टीसाठी पत्नीची जुगारात लावली बोली, पण हरला डाव; मग...

महाभारतात युधिष्ठिरनं दुर्योधनासोबत जुगार खेळताना पत्नी द्रौपदीला पणाला लावून गंभीर चूक केली होती. यानंतर त्यांना पराभवाचादेखील सामना करावा लागला होता. अशीच काहीशी घटना खऱ्या आयुष्यातही घडल्याचे वृत्त समोर आले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनौ, 21 ऑगस्ट : महाभारतात युधिष्ठिरनं दुर्योधनासोबत जुगार खेळताना पत्नी द्रौपदीला पणाला लावून गंभीर चूक केली होती. यानंतर त्यांना पराभवाचादेखील सामना करावा लागला होता. ही कहाणी तर तुम्हाला माहितीच असेल. अशीच काहीशी घटना खऱ्या आयुष्यातही घडल्याचे वृत्त समोर आले आहे. कलियुगातल्या एका पतीनं केवळ बाइक मिळवण्यासाठी आपल्या पत्नीचीच जुगारात बोली लावली. नवऱ्यानं केलेलं हे घाणेरडं कृत्य माहिती होताच महिलेनं गोंधळ घातला आणि ती माहेरी निघून गेली. उत्तर प्रदेशातील ही घटना आहे. आरोपी पतीचं नाव विपिन असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सासरच्यांनी लग्नात बाइक न दिल्यानं विपिननं काही दिवसांपूर्वी बाइकसाठी जुगाराचा डाव खेळला. धक्कादायक बाब म्हणजे या खेळात त्यानं स्वतःच्या बायकोलाच पणाला लावलं आणि हा डाव तो हरला. (वाचा: सावधान! पॉर्न साइट पाहणाऱ्यांनो तुमचा खासगी डेटा झाला लीक) पत्नीनं घातला गोंधळ यानंतर विपिननं पत्नीला जुगारात जिंकलेल्या व्यक्तीसोबत जाण्यास सांगितलं तेव्हा तिनं गोंधळ घातला. कारण जिंकणारी व्यक्ती विपिनच्या पत्नीसोबत जबरदस्ती करू लागला. महिलेनं कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि थेट माहेर गाठलं. घरी पोहोचताच तिनं नवऱ्यानं केलेला प्रताप कुंटुबीयांना सांगितला. यापूर्वीही विपिननं बाईकसाठी पत्नीला मारहाण करत घराबाहेर काढलं होतं. हे सारं काही त्यानं पत्नी गर्भावती असताना केलं. विपिनच्या छळाला कंटाळून अखेर महिलेनं तहसील एसडीएममध्ये तक्रारही नोंदवली. (वाचा: पुण्यात भर रस्त्यात तिने दिली कपडे काढायची धमकी.. पोलिसांवर केली अश्लील शेरेबाजी) राज ठाकरेंच्या मदतीला दादूस आला धावून, पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात