ममता बॅनर्जींचं अमित शहांना 'टशन'; रॅलीची परवानगी केली रद्द

ममता बॅनर्जींचं अमित शहांना 'टशन'; रॅलीची परवानगी केली रद्द

ममता बॅनर्जी आणि भाजपमधील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.

  • Share this:

कोलकाता, 13 मे : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमधील वाद सर्वश्रृत आहे. पण, हा वाद अद्याप देखील शमलेला नाही. दोन्ही पक्षांतील नेते परस्परांवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत. अमित शहा यांच्या रॅलीला परवानगी नाकारल्यामुळे आता पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची जाधवपूर येथे रॅली आयोजित करण्यात आली होती. पण, त्यांच्या रॅलीला देण्यात आलेली परवानगी आता ममता बॅनर्जी सरकारनं रद्द केली आहे. शिवाय, हेलिकॉप्टर उतरवण्यास देखील परवानगी देण्यात आलेली नाही. त्यानंतर आता भाजप निवडणूक आयोगाकडे धाव घेत तक्रार करणार आहे. त्यामुळे पुढं नेमकं काय घडणार हे पाहावं लागणार आहे. भाजपनं लोकसभेकरता पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रीत केलं असून त्यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

लोकसभेच्या झंझावाती सभांनंतर राज 'बॅक टू अ‍ॅक्शन'

भाजप विरूद्ध ममता बॅनर्जी

अमित शहा, नरेंद्र मोदी विरूद्ध ममता बॅनर्जी वाद सध्या देशाच्या केंद्रस्थानी आहे. यापूर्वी देखील फानी चक्रीवादळानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. शिवाय, लोकसभा निवणुकीची घोषणा होण्यापूर्वी भाजपच्या राज्यव्यापी यात्रेला राज्य सरकारनं परवानगी नाकरली होती. त्यानंतर हे सारं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं होतं. ममता बॅनर्जी मला मिठाई पाठवतात असं नरेंद्र मोदी यांनी म्हटल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.

भाजपसाठी पश्चिम बंगाल महत्त्वाचं

लोकसभेसाठी भाजपनं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या राज्याला हादरा देण्याचा प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण, ममता बॅनर्जींनी त्यांना कडवं आव्हान उभं केलं आहे. भाजपविरोधी आघाडीमध्ये देखील ममता बॅनर्जी सामील झाल्याअसून त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

SPECIAL REPORT: वृद्ध आई-वडिलांमुळे लग्न जमेना, तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी

First published: May 13, 2019, 10:11 AM IST

ताज्या बातम्या