Lockdown : नागपूरमधून तमिळनाडूला चालत निघाला तरूण, तेलंगणात झाला ह्रदयविकाराने मृत्यू

Lockdown : नागपूरमधून तमिळनाडूला चालत निघाला तरूण, तेलंगणात झाला ह्रदयविकाराने मृत्यू

सलग तीन दिवस तो चालत होता. त्याचा ताण त्याच्या शरीर आणि मनावर झाला होता. त्यामुळे त्याला ह्रदयविकाराचा झटका आला असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

  • Share this:

सिकंदराबाद 03 एप्रिल : लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. लाखो तरूणांनी तर शहरातून पायपीट करत आपल्या गावाची वाट धरली. असे जत्थेच्या जत्थे मोठ्या शहरांमधून आपल्या गावी जात आहेत. असेच 26 तरूण नागपूरमधून तमिळनाडूला निघाले होते. तीन दिवस चालत ते तेलंगणात पोहोचले. त्यानंतर अतिश्रमामुळे त्यातल्या एका 23 वर्षांच्या तरूणाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. एनडीव्हीने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.

बाला सुब्रमणी लोगेश असं त्या तरूणाचं नाव आहे. हा तरूण तमिळनाडूच्या नमक्कल इथं जात होता. सिकंदराबाद जवळच्या मेरडपल्ली इथं त्यांनी एका निवाऱ्यात मुक्काम केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. सलग तीन दिवस तो चालत होता. त्याचा ताण त्याच्या शरीर आणि मनावर झाला होता. त्यामुळे त्याला ह्रदयविकाराचा झटका आला असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

कोरोनाव्हायरची साथ भारतात सुरू झाली त्याला आता जवळजवळ महिना झाला. सुरुवातीला मोठ्या शहरांपुरता आणि परदेशी प्रवाशांपुरता असलेला संसर्ग गेल्या काही दिवसात देशभर झपाट्याने वाढतो आहे.

मोदींच्या ‘त्या’ घोषणेनंतर ऊर्जा मंत्रालय हादरलं, वीज पुरवठाच होऊ शकतो ठप्प

कोरोनाग्रस्तांची संख्या भारतात अजूनही इतर काही देशांच्या तुलनेत कमी आहे. ही साथ दुसऱ्या टप्प्यातच असल्याचं यंत्रणांचं म्हणणं आहे. पण ही साथ लॉकडाउन काळ संपल्यानंतर वेगाने फैलावू शकते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेमध्ये कोरोना साथ कळस गाठू शकते, असा ICMR मधील तज्ज्ञांचा अंदाज आहे.

भारतात या साथीचा कहर (Peak of pendemic) या महिन्याच्या अखेरीला किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे लॉक डाउन संपलं तरी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेच लागणार आहेत.

मुंबईतली ही 9 ठिकाणं आहेत ‘कोरोना’चे ‘हॉटस्पॉट’, आता ड्रोन नजर ठेवणार

इटली आणि स्पेनमध्ये जे आत्ता घडत आहे तसा वेगाने फैलाव आणि वाढता मृत्युदर रोखायचा असेल तर घरात राहणं याला पर्याय नाही, असं तज्ज्ञ सांगतात. गर्दी टाळली तरच या विषाणूचं संक्रमण आटोक्यात राहील. भारतासारख्या देशात लोकसंख्या आणि राहण्याची पद्धत लक्षात घेता कोरोनाची साथ उग्र रूप धारण करू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

 

 

First published: April 3, 2020, 8:51 PM IST

ताज्या बातम्या