Lockdown : अडलेल्या लग्नाला पोलीस आले धावून, आई वडिलांच्या डोळ्याला लागल्या धारा

Lockdown : अडलेल्या लग्नाला पोलीस आले धावून, आई वडिलांच्या डोळ्याला लागल्या धारा

लग्न लागणार की नाही या विवंचेत असलेल्या पालकांच्या डोळ्याला लग्न झाल्यावर धारा लागल्या होत्या.

  • Share this:

नवी दिल्ली 25 एप्रिल: कोरोना आणि Lockdownमुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळे व्यवहार ठप्प आहेत. डॉक्टर्स आणि पोलीस प्रयत्नांची शर्थ करत आहेत. पोलिसांना सुरक्षेचं काम करताना लोकांना घरातच राहण्यासाठी खूप धडपड करावी लागत आहे. अशा वेळी कधी दंडुक्याचा वापरही करावा लागतो. त्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. मात्र दिल्लीत पोलिसांनी सहकार्य करत एक लग्न लावून दिलं. त्यामुळे नवरी नवरदेवांच्या आई वडिलांना भरून आलं.

दिल्लीतल्या कालकाजी परिसरात राहणारे नरेश अहलूवालिया यांच्या कौशल या 27 वर्षांच्या मुलाचं लग्न ठरलं होतं. सगळी तयारी झाली होती. उत्साहात आपल्या लाडक्या लेकाचं लग्न करावं असं त्यांनी स्वप्न बघितलं होतं. मात्र कोरोनामुळे त्यांच्या सगळ्याच स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं. किमान लग्नतरी लागावं अशी मुला-मुलीच्या पालकांची इच्छा होती.

शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला मदतीसाठी विनंती केली. बऱ्याच प्रयत्नानंतर शेवटी पोलीस तयार झाले. स्थानिक आर्य समाज मदिंरात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत लग्न झालं. नवरी नवदेवाला पोलिसांनी त्यांच्याच गाडीतून घरी सोडलं.

हेही वाचा - पाण्यापेक्षाही स्वस्त झाल्या कच्च्या तेलाच्या किंमती, भारतात दर कमी होणार का?

पोलिसांच्या सहकार्यामुळे एका नव्या संसाराला सुरूवात झाली. लग्न लागणार की नाही या विवंचेत असलेल्या पालकांच्या डोळ्याला लग्न झाल्यावर धारा लागल्या होत्या. कारण त्यांना लग्न होईल अशी आशाच वाटत नव्हती. पोलीस स्टेशन हे सामान्य माणसांसाठी हक्काचं घर आहे हे दिल्ली पोलिसांनी दाखवून दिलं.

हेही वाचा -

महाराष्ट्राचा धोका वाढतोय, देशातल्या या 7 राज्यांमध्ये वेगाने पसरतोय कोरोना

'लग्न होणारच होतं पण...', रतन टाटांनी सांगितली त्यांची Love Story

 

 

First published: April 25, 2020, 8:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading