मराठी बातम्या /बातम्या /मनी /

3 महिन्यांचा EMI थांबवण्यासाठी मागितला जातोय OTP, पोलिसांचं 'अलर्ट' राहण्याचं आवाहन

3 महिन्यांचा EMI थांबवण्यासाठी मागितला जातोय OTP, पोलिसांचं 'अलर्ट' राहण्याचं आवाहन

आरबीआयने दिलेल्या सवलतीनुसार ग्राहकांना 3 महिन्याचा ईएमआय स्थगित करण्याची  मुभा दिली आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेत काही भामटे सामान्यांना लुबाडण्याचं काम करत आहेत.

मुंबई, 08 एप्रिल : कोरोनामुळे देशातील नागरिकांचं अगणित आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत आरबीआय (Reserve Bank of India RBI)कडून सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक योजना राबण्यात येत आहेत. आरबीआयने EMI वर 3 महिन्यांची सवलत दिली आहे. म्हणजेच तुमच्या मुदत कर्जाचा हफ्ता 3 महिन्यांनी भरणं शक्य आहे. 3 महिन्यांसाठी ईएमआय स्थगित करण्यासाठी त्या त्या बँकेकडून तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर त्या आशयाचा मेसेज पाठवण्यात येत आहे. मात्र काहीजण या परिस्थितीचा फायदा घेत लोकांना लुबाडत असल्याची बाब समोर येत आहे.

(हे वाचा-COVID-19 : गरिबांना मोदी सरकाराचा मदतीचा हात, आर्थिक साहाय्यासाठी 6,834 कोटी)

पीआयबी फॅक्ट चेख (PIB Fact Check) आणि एसबीआयने याबाबत ग्राहकांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे. PIB Fact Check ने एसबीआयचं ट्वीट रीट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

त्याचबरोबर याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. जर तुम्हाला 3 महिन्याचा ईएमआय स्थगित करायचा असेल, तर बँकेने पाठवलेल्या मेसेजमध्ये त्याकरता करावी लागणारी प्रक्रिया नमुद केलेली आहे. मात्र पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलेल्या ट्वीटनुसार काही फसवणूक करणारे व्यक्ती हकांना त्यांचे ईएमआय स्थगित करण्यासाठी ओटीपी सांगण्यासाठी कॉल करत आहेत. त्यानंतर ग्राहकांच्या खात्यातील पैसे लाटण्याचे बेकायदेशीर काम सुरू आहे. परिणामी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अशाप्रकारे कोणालाही ओटीपी (OTP) न सांगण्याचे आवाहन केले आहे.

आरबीआयने दिलेल्या सवलतीमध्ये सर्व वाणिज्य बँका- Commercial Banks (प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँक आणि स्थानिक क्षेत्रातील बँकांसह), सहकारी बँका, अखिल भारतीय वित्तीय संस्था आणि एनबीएफसी (गृहनिर्माण वित्त कंपन्या आणि मायक्रो-फायनान्स संस्थांसह) समाविष्ट आहेत. आरबीआयने सर्व टर्म लोनवर 3 महिन्यांचा मोरोटोरियम लागू केला आहे.

(हे वाचा-कोरोनामुळे 'या' क्षेत्रातील 80,000 लोकांच्या नोकरीवर गदा, सर्व्हेतून माहिती समोर)

यामुळे बँकानी त्यांच्या ग्राहकांना 3 महिन्याचा ईएमआय न भरण्याची मुभा दिली आहे आणि यामुळे त्यांचा क्रेडिट स्कोर देखील खराब होणार नाही. मात्र जर अशा पद्धतीने कुणी लुबाडण्याचा प्रयत्न करत असेल, तर सावध आणि जागरूक राहणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Rbi