तिरुवअनंतपूरम, 21 एप्रिल : कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊनची स्थिती आहे. भारतातही 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. याकाळात पोलीस, आरोग्य कर्मचारी, प्रशासन, सफाई कामगार अहोरात्र झटत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशात एक महिला भर उन्हात ड्युटी कऱणाऱ्या पोलिसांना कोल्ड्रिंक देत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. महिन्याला 3500 कमावणारी महिना पोलिसांना मदत करत होती. आता असाच एक अवलिया पोलिसांना मदत करत आहे. केरळमध्ये नारळ तोडण्याचं काम करणारा गिरेश पोलिसांना मदत करत आहे.
केरळमधील कलावून इथं राहणाऱा गिरेश त्याच्या कमाईतून पोलिसांना पानी आणि थोडंसं खायला देत आहे. एएनआयशी बोलताना गिरेश म्हणाला की, मी माझ्या कमाईतील काही भाग खर्च करून पोलिसांची मदत करत आहे. मी जास्त कमत नाही. त्यामुळं फक्त केळं आणि सोड्याची बाटली देत आहे.
Kerala: Gireesh, a coconut tree climber in Kalavoor, Alappuzha provides food&water to Police personnel since #CoronavirusLockdown began. He says,"From my small earning, I'm spending a part for Police who are serving us.I don't earn much,so I give them banana or a bottle of soda." pic.twitter.com/7JxpYvQUoT
— ANI (@ANI) April 21, 2020
कलावूरचे पोलीस उपनिरीक्षक टाल्सन जोसेफ यांनीही गिरेशच्या कामाचं कौतुक केलं. ते म्हणाले की, मी रोज या व्यक्तीला गाडीवरून पाहतो. त्याची चौकशी केली तेव्हा समजलं की तो पोलिसांना पाणी आणि स्नॅक्स देतो. तो बाइकवरून साहित्य घेऊन येतो. ड्युटीवर असलेल्या पोलिसांना तो खाद्यपदार्थ आणि पाणी देतो.
हे वाचा : आता पडा घराबाहेर! दोघं फिरायला गेले आणि एकमेकांनाच बदडावं लागलं, पाहा VIDEO
गिरेश नारळ तोडायचं काम करतो. त्याच्या कमाईतून जे काही पैसे मिळतात त्यातून तो पोलिसांना मदत करतो. त्याच्या या कामाचं सोशल मीडियावरून कौतुक केलं जात आहे. तो म्हणतो की, पोलिस आपल्यासाठी काम करतात त्यांच्यासाठी माझ्या कमाईतला लहान भाग मी खर्च करतो.
हे वाचा : कोरोना योद्धा! रुग्णांसाठी टॅक्सी चालकाने लावली जीवाची बाजी, केली अशी मदत
संपादन - सूरज यादव
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus