स्पेन, 21 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) या देशात 20000 हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टर आणि नर्सेस आपल्या जीवाची बाजी लावून कोरोना (Covid -19) रुग्णांचा वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच या जीवघेण्या आजारात असेही काहीजण आहेत जे कोरोनाच्या लढ्यात निस्वार्थ भावनेने सेवा करीत आहेत. स्पेनमध्ये एका टॅक्सी ड्रायव्हरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कारण त्याने केलेलं काम आज एक आदर्श म्हणून समोर आलं आहे.
या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती व्यवसायाने टॅक्सी ड्रायव्हर आहे. तो रुग्णालयात जसा प्रवेश करतो तसं डॉक्टर, नर्सेस आणि इतर कर्मचारी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करतात. यामुळे तो भावूक झाला आहे. अशावेळी त्याला एक वस्तू दिली जात आहेत. त्यांच्या हातात टॅक्सी ड्रायव्हरचा कोरोनाचा रिपोर्ट आहे आणि सुदैवाने तो यात निगेटिव्ह आला आहे. लोकांची सेवा करताना त्याने स्वत:च्या जीवाची पर्वा केली नाही. कोरोनाबाधित असतानाही अशा रुग्णांना रुग्णालयात पोहोचवणं आणि घरी घेऊन जाणं असं काम तो करतो. त्याचं हे काम खरंच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.
"Es una sorpresa que le hemos dado a un taxista que lleva a pacientes sin cobrar al hospital.Le hemos dado un sobre con dinero y una dedicatoria.Le hemos llamado para decirle que tenía que hacer un traslado y ha sido muy emocionante. No paraba de llorar." Gracias a el y a ellos. pic.twitter.com/CcXX1BVfko
— #ElTaxiUnido (@eltaxiunido) April 18, 2020
मन हेलावणारा हा व्हिडीओ ट्विटरवर मोठ्या संख्येने पाहिला जात आहे. EI TaxiUnido यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 1 कोटीहून जास्त वेळा पाहिला आहे.
संबंधित - प्रेरणादायी! लॉकडाऊनमध्ये कामाचा सदुपयोग, 'हा' वल्ली तयार करतोय कोरोना लायब्ररी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Taxi Driver