अंडरवर्ल्ड डॉन मुथप्पा राय याचं निधन, बॅंक ऑफिसर ते गॅंगस्टर असा होता प्रवास

अंडरवर्ल्ड डॉन मुथप्पा राय याचं निधन, बॅंक ऑफिसर ते गॅंगस्टर असा होता प्रवास

मुथप्पा यांनी 1980च्या दशकात अंडरवर्ल्डच्या हल्ल्यापासून बंगळुरुमधील व्यवसाय आणि एक बार आणि रेस्टॉरंट मालकाला वाचवलं होतं, तिथूनच त्यांच्या अंडरवर्ल्ड प्रवासाला सुरुवात झाली.

  • Share this:

बंगळुरू, 15 मे : अंडरवर्ल्ड डॉन मुथप्पा राय याचं वयाच्या 68व्या वर्षी शुक्रवारी मध्यरात्री बंगळुरू इथं निधन झालं. गॅंगस्टर ते व्यवसायिक असा मुथप्पा यांचा प्रवास होता. 80च्या दशकात मुथप्पा राय यांनी आपला एक दबदबा निर्माण केला होता, मात्र 2002नंतर त्यांनी अंडरवर्ल्ड सोडून सामाजिक कार्यकर्ता होण्याचा निर्णय घेतला. गेले काही दिवस मुथप्पा कर्करोगासारख्या गंभीर आजाराला लढा देत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र शुक्रवारी मध्यरात्री त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि पत्नी असा परिवार आहे.

मुथप्पा राय यांनी विजया बँकेत लिपीक म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. मुथप्पा यांनी 1980च्या दशकात अंडरवर्ल्डच्या हल्ल्यापासून बंगळुरुमधील व्यवसाय आणि एक बार आणि रेस्टॉरंट मालकाला वाचवलं होतं, तिथूनच त्यांच्या अंडरवर्ल्ड प्रवासाला सुरुवात झाली. तत्कालीन राज्यकर्ते डॉ. एम. पी. जयराज यांच्या हत्येमागे मुथप्पा राय यांचा हात होता. ते सतत दाऊद इब्राहिमच्या संपर्कात होता, असेही पोलिसांचे म्हणणे होते.

1994मध्ये शहर न्यायालयात मुथप्पा राय यांना हजर केल्यानंतर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता, त्यातून ते थोडक्यात वाचले. त्यानंतर 1996मध्ये दाऊदच्या मदतीनं दुबईला पळून गेले. मात्र काही वर्षांनी त्यांनी दाऊदच्या विरोधात भारतीय सुरक्षा यंत्रणांना मदत केल्याचे गुप्तचर सूत्रांनी सांगितले होते.

मुथप्पा रायला 2002मध्ये दुबईतील अधिकाऱ्यांनी अटक केल्यानंतर प्रत्यार्पण करून भारतात आणले. त्यांच्यावर बिल्डर सुब्बाराजूच्या हत्येसह एकूण आठ गुन्ह्यांविरुद्ध खटला दाखल केला. मात्र, कोणतेही पुरावे न मिळाल्यानं त्यांची निर्दोष सुटका झाली. त्यानंतर 2008मध्ये मुथप्पा यांनी अंडरवर्ल्ड सोडून समाजकार्य करणार असल्याचं सांगितले. त्यांनी कन्नड संस्था "जया कर्नाटक" ला सुरुवात केली आहे. बिदादी येथील अत्यंत संरक्षित राजवाड्यात राहणाऱ्या मुथप्पा यांनी स्वत: ला रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यवसायिक म्हणून घोषित केलं. 2018 मध्ये ते कर्नाटक अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. 2002मध्ये दुबईतून प्रत्यार्पण करून भारतात परत आल्यापासून कोणत्याही गुन्हेगारी कारवाया केल्याचा आरोप त्यांच्यावर झालेला नाही. मात्र गेले काही वर्ष कर्करोगाची त्यांचा सामना होता, मात्र शुक्रवारी त्यांचे निधन झाले.

मुथप्पा यांच्यावर आज बंगळुरूमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. त्यांचा एक मुलगा कॅनडा स्थायिक असल्यामुळं तो येऊ शकणार नाही. राय परिवाराच्या वतीनं लॉकडाऊनचे नियम पाळत, अंत्यसंस्काराला गर्दी न करण्याचे आवाहन कार्यकर्ते आणि जनतेला केलं आहे.

First published: May 15, 2020, 8:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading