Home /News /national /

India-China Standoff: चीनला भारताचा आणखी एक दणका, लष्कराने केली जय्यत तयारी

India-China Standoff: चीनला भारताचा आणखी एक दणका, लष्कराने केली जय्यत तयारी

गरम कपडे, इंधन, अन्न धान्य, तंबू, औषधं अशी सगळी साधन सामुग्री ठाण मांडून बसलेल्या सैनिकांसाठी पाठवली जात आहे.

    नवी दिल्ली 25 जुलै: लडाख जवळच्या चीन सीमेवर असलेला तणाव फारसा निवळलेला नाही. (India China Border dispute) लष्करी आणि मुत्सद्देगिरीच्या पातळीवर चर्चा झाल्यानंतरही चीनचं लष्कर(China Army) अजुनही फारसं मागे हटायला तयार नाही. त्यामुळे भारतानेही त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा निर्णय घेत चीनला दणका दिला आहे. जोपर्यंत चिनी सैन्य हटणार नाही तोपर्यंत भारताचं लष्करही (Indian Army)  त्याच ठिकाणी राहिल असा इशारा लेफ्टनंट जनरल वाय.के. जोशी यांनी दिला आहे. जोशी हे लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख आहेत. त्यामुळे हा तणाव लवकर निवळण्याची चिन्हे दिसत नसल्याचं म्हटलं जात आहे. नियंत्रण रेषेवर चिनी सैन्य मागे हटणार नाही अशी स्थिती दिसत असल्याने आता भारतीय लष्कराने जय्यत तयारीला सुरुवात केली आहे. हा भाग दुर्गम आणि प्रतिकूल हवामान असलेला आहे. त्यामुळे तिथे विशेष काळजी घ्यावी लागते. त्या सगळ्याचा अंदाज घेऊन आता लष्कराने साधन सामुग्री जमा करायला सुरुवात केली आहे. गरम कपडे, इंधन, अन्न धान्य, तंबू, औषधं अशी सगळी साधन सामुग्री ठाण मांडून बसलेल्या सैनिकांसाठी पाठवली जात आहे. सगळ्या पातळीवर चर्चा करूनही जर सैन्य हटत नसेल तर भारतही आता ठाम असून कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही आवश्यक ती सर्व तयारी करत असल्याचंही जोशी यांनी सांगितलं. लष्करी कमांड दर्जाच्या अधिकाऱ्यांची चार फेऱ्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभालही चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशीही बोलले होते. मात्र चीन आडमुठी भूमिका सोडायला तयार नाही. चीनला धक्का : 72 तासांत दूतावास बंद करण्याच्या अमेरिकेच्या आदेशावर चीनची धमकी चीनसोबत सुरू असलेल्या सीमा विवादादरम्यान मोदी सरकारने Emergency Powers चा वापर करीत फ्रान्सच्या हॅमर मिसाइल मागविल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील मिसाइल्स 29 जुलै रोजी भारतात पोहोचतील. या मिसाइल्सनां राफेल विमानांमध्ये लावण्यात येतील. जगातील सर्वात चांगल्या लढाऊ विमानांपैकी राफेलची मारक क्षमता हॅमर मिसाइल्ससह अधिक घातक होईल. हे मिसाइल्स 60 ते 70 किमी लांबपर्यंत निशाणा साधू शकतात. चीनविरुद्ध लष्कराकडे आता तिसरा डोळा, ‘भारत’ ठेवणार ड्रॅगनवर करडी नजर वृत्तसंस्था एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. त्यानुसार हॅमर मिसाइल्स भारतात आल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या बंकरवर निशाणा लावण्याची क्षमता अधिक वाढेल. हॅमर HAMMER (Highly Agile Modular Munition Extended Range) एक मध्यम अंतरावर हल्ला करणारी मिसाइल आहे. जी फ्रान्स एअरफोर्स आणि नेव्हीसाठी तयार करण्यात आली आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या