Home /News /national /

कोरोनाच्या संक्रमणात 'तबलिगी'चा हात उघडकीस आणल्यानंतर न्यूज अँकर आणि पत्रकारांना धमक्या

कोरोनाच्या संक्रमणात 'तबलिगी'चा हात उघडकीस आणल्यानंतर न्यूज अँकर आणि पत्रकारांना धमक्या

जगात कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढत असताना अनेक देशांत या जमातीच्या शिबीरांचं आयोजन केलं जात होतं. मलेशिया आणि इंडोनेशिया सारख्या देशांचा यात समावेश आहे.

जगात कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढत असताना अनेक देशांत या जमातीच्या शिबीरांचं आयोजन केलं जात होतं. मलेशिया आणि इंडोनेशिया सारख्या देशांचा यात समावेश आहे.

भारतामध्ये कोरोनाचा धोका 'तबलिगी' प्रकरणानंतर अधिक वाढला. दरम्यान याबाबत बातम्या प्रसारित करणाऱ्या आणि माहिती देणाऱ्या पत्रकार-अँकर्सना धमक्या मिळत असल्याची माहिती समोर येत आहे.

    नवी दिल्ली, 06 एप्रिल : भारतामध्ये कोरोनाचा धोका 'तबलिगी' प्रकरणानंतर अधिक वाढला. दरम्यान याबाबत बातम्या प्रसारित करणाऱ्या आणि माहिती देणाऱ्या पत्रकार-अँकर्सना धमक्या मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन (News Broadcasters Association NBA)ने समाजातील काही विशिष्ट वर्गातील लोकांकडून न्यूज चॅनेलमध्ये काम करणारे पत्रकार आणि अँकर यांना होणारी शिवीगाळ आणि मिळणाऱ्या धमक्या याबाबत चिंता व्यक्त केली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाने अलीकडे कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) प्रसारामध्ये तबलिगी जमातची भूमिका उघडकीस आणली. या घटनेनंतरच देशामध्ये पॉझिटिव्ह केस आणि मृत्यूचं प्रमाण वाढलं. त्यानंतर अँकर आणि रिपोर्टर्सबाबतचा हा ट्रेंड प्रामुख्याने समोर आला आहे. (हे वाचा-दिल्लीतील मरकज प्रकरणावर अखेर शरद पवारांचं परखड भाष्य) व्हॉट्सअ‍ॅप, टिकटॉक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन न्यूज चॅनेलमध्ये काम करणारे अँकर आणि रिपोर्टर यांना खास लक्ष्य केले जात आहे.सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात काही धर्मोपदेशक टीव्ही न्यूज अँकरचे नाव घेऊन टीका करत आहेत तर ठराविक चॅनेलच्या रिपोर्टरवर हल्ल्याची धमकी देत ​​आहेत. एनबीएकडून या संपूर्ण प्रकाराची निंदा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सरकार आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींना अशा असामाजिक घटकांवर त्वरित प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. (हे वाचा-तबलिगींचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड, 2 मजल्यांची परवानगी; बांधली 7 मजली इमारत) एनबीएच्या माहितीनुसार इलेक्ट्रॉनिक मीडियाने सध्याच्या लॉकडाऊन दरम्यान उत्तम काम केले आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत जागरुकता पसरवण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक पत्रकाराने योग्य आणि संतुलित रिपोर्टिंग केले आहे. समाजातील सर्व घटकांना टीव्ही डिबेटमध्ये प्रतिनिधीत्व करण्यासाठी समान संधी देण्यात आली आहे. त्यामुळे एनबीएने धार्मिक कट्टरपंथीयांना विविध न्यूज चॅनेल्सना खुलेआम धमकी देण्याबाबत इशारा दिला आहे. राज्यघटनेत नमूद केल्याप्रमाणे, अशा कृती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करतात. कट्टरतावाद्यांसह समाजातील सर्व घटकांकरिता वृत्तवाहिन्या उपलब्ध आहेत. या नेत्यांनी पुढे येऊन कोरोनाव्हायरसच्या प्रसारात तबलिगी जमातचा असणारा हात याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी त्यांची इच्छा एनबीएने व्यक्त केली आहे
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या