नवी दिल्ली 16 मे: लॉकडाऊन 3.0 संपायला आता केवळ १ दिवस राहिला आहे. सोमवारपासून 4.0 सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लॉकडाऊन 4.0चे संकेत दिले होते. मात्र हा लॉकडाऊन पूर्णपणे वेगळा असेल असंही त्यांनी सांगितलं होतं. हा लॉकडाऊनही 15 दिवसांचा असणार आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रविवारी रात्री याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
या लॉकडाऊनमध्ये अनेक सुविधा दिल्या जाऊ शकतात. उद्योग सुरू करण्याबाबात आणखी सुट मिळू शकते. त्याच बरोबर सार्वजनिक वाहतूक आणि कॅबलाही परवानगी मिळू शकते. शाळा कॉलेजेस आणि इतर शैक्षणिक संस्था मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत.
मॉल्स, हॉटेल्स आणि बाजारही बंदच राहणार आहेत. अत्यावश्यक सेवांना पूर्वीप्रमाणेच सुट राहणार आहे. नवा लॉकडाऊन कसा असावा याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी दिवसभर अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या.
राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 30 हजार 706 झाली आहे. आज 1606 नविन रुग्णांचे निदान झाले असून आज 524 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात 7088 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 22 हजार 479 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोनातून ठणठणीत होऊन परतली महिला डॉक्टर, शेजाऱ्यांनी तिच्या घराला घातलं कुलूप
पोलिसांच्या 'आशिर्वादा'ने सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर खूनी खेळ, एकाची हत्या
राज्यात 67 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी 22 मृत्यू हे गेल्या 24 तासातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे 14 एप्रिल ते 14 मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील 41, पुण्यात 7, ठाणे शहरात 7, औरंगाबाद शहरात 5, जळगावमध्ये 3, मीरा भाईंदरमध्ये 2, नाशिक शहरात 1 तर सोलापूर शहरामध्ये 1 मृत्यू झाला आहे.