Home /News /crime /

पोलिसांच्या 'आशिर्वादा'ने सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर एकाची हत्या, मित्रानेच केला खेळ खल्लास

पोलिसांच्या 'आशिर्वादा'ने सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर एकाची हत्या, मित्रानेच केला खेळ खल्लास

लॉकडाऊनमध्ये दारूमुळे झालेल्या वादात मित्रानेच मित्राला संपवल्याच्या अनेक घटना समोर आल्या असताना आता असाच हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अहमदनगर, 16 मे : राज्यावर कोरोनाचं संकट असताना या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी आता चौथ्या टप्प्यात लॉकडाऊन जारी करण्याची वेळ आली आहे. पण या सगळ्यात गुन्ह्यांचं प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. लॉकडाऊनमध्ये दारूमुळे झालेल्या वादात मित्रानेच मित्राला संपवल्याच्या अनेक घटना समोर आल्या असताना आता असाच हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. असं काही घडलं की मित्रानेच दुसऱ्या मित्राचा खून केला आहे. जुगार खेळामध्ये दोन मित्रांमध्ये वाद झाला. या वादातून एकाने दुसऱ्याला मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना नगर शहरातील पाईपलाईन रोडवर असलेल्या तागड वस्तीमध्ये घडली आहे. दोघांमध्ये पैशाच्या वादावरून भांडणं झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. जुगाराचा क्लब अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे मोठ्या रक्कमेचा हा क्लब आहे. लाऊडस्पीकरवरुन अजान देणं हा इस्लाम धर्माचा भाग नाही - अलाहाबाद उच्च न्यायालय या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. नंदकिशोर गणपत मंचरे (वय-54 रा. पाईपलाईन) असं खून झालेल्या इसमाचं नाव आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन नानासाहेब भोजने (रा. पाईपलाईन) असं खून करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. दरम्यान आरोपी भोजनेला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कोरोनानंतर आता पावसानं ओढावलं संकट, मुंबईत एकाचा मृत्यू तर 7 कुटुंब उघड्यावर सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून हा जुगार अड्डा स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याची चर्चा स्थानिक नागरिक करत आहेत. त्यामुळे यामागे नेमका कोणाचा हात होता याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे. या राज्यांमध्ये येणार Amphan चक्रीवादळ, ताशी 190 किमी वेगाने वाहतायत वारे संपादन - रेणुका धायबर
Published by:Manoj Khandekar
First published:

पुढील बातम्या