धर्मापेक्षा माणुसकी मोठी! मुस्लिम बांधवांनी केले शीख मजुरावर अंत्यसंस्कार

धर्मापेक्षा माणुसकी मोठी! मुस्लिम बांधवांनी केले शीख मजुरावर अंत्यसंस्कार

जम्मू-काश्मीरमध्ये घडलेल्या या घटनेने डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सुतारकाम करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका पंजाबमधील शीख तरूणावर स्थानिक मुस्लिम व्यक्तींनी अंत्यसंस्कार केले आहेत.

  • Share this:

गंडर्बल (जम्मू-काश्मीर), 16 मे : सध्या देशभरामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे वाईटच बातम्या कानावर पडत आहेत. मात्र काही ठिकाणी माणुसकीचं दर्शन होत आहे. काही माणसं जात, धर्म, पंथ हे सर्वकाही विसरून मानवतेचं दर्शन घडवून आणत आहेत. सध्याच्या परिस्थितीत सर्वात भरडला गेला आहे तो मजूर वर्ग. त्यांना मदत करण्यासाठी त्या त्या ठिकाणचे स्थानिक देखील एकवटले आहेत. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये घडलेल्या या घटनेने डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये सुतारकाम करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका पंजाबमधील शीख तरूणावर स्थानिक मुस्लिम व्यक्तींनी अंत्यसंस्कार केले आहेत. माणूस कोणत्याही जाती-धर्माचा असल्यास अशा संकटकाळात त्यांना मदत करणे गरजेचं असल्याचे गावकरी सांगतात.

(हे वाचा-गुजरातमध्ये पोलिसांवर तुफान दगडफेक, जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुराचा मारा)

गंडर्बल जिल्ह्यामधील वाकुरा गावात हा शीख बांधन सुतारकाम करत असे. रणवीर सिंह असं या मृत इसमाचे नाव आहे. काही कामगारांबरोबर तो भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याच्या मृत्यूची बातमी स्थानिकांनीच पोलिसांना कळवली. स्थानिक तहसीलदार गुलाम मोहम्मद भट यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार स्थानिकांंनीच रणवीर यांचे अंत्यसंस्कार केले. त्यासाठी सर्व खर्च त्यांनीच केला एवढेच नव्हे तर रणवीर यांच्या पत्नीच्या खात्यामध्ये देखील काही रक्कम त्यांनी जमा केली. लॉकडाऊनच्या काळात त्यांचा मृतदेह पंजाबमध्ये नेणं शक्य नसल्याने गावकऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचे गुलाम मोहम्मद सांगतात. अशावेळी जातधर्माचा विचार न करता मदत करणे गरजेचं असल्याचे स्थानिक गावकरी अब्दुल रेहमान यांनी सांगितले

(हे वाचा-कोरोनाच्या संकटात शहीद जवानाच्या पत्नीची मदत, आयुष्यभर साठवलेले पैसे केले दान)

वाकुरामध्ये काही मजूर अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्यामुळे ते याच गावाचा एक हिस्सा बनले आहेत. आपलेपणाच्या भावनेने ही मदत केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

First published: May 17, 2020, 12:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या