मराठी बातम्या /बातम्या /देश /3 वर्षात 3 वेळा एकाच ठिकाणी सिंहाचा जीवघेणा हल्ला; Shocking आहे या तरुणाची कहाणी

3 वर्षात 3 वेळा एकाच ठिकाणी सिंहाचा जीवघेणा हल्ला; Shocking आहे या तरुणाची कहाणी

गेल्या तीन वर्षांत या तरुणावर सिंह-सिंहिणीचा हा तिसरा हल्ला असल्याचं बोललं जात आहे. आश्‍चर्य म्हणजे दरवेळी त्याच ठिकाणी भावेशवर हल्ला होतो.(Lion Attack)

गेल्या तीन वर्षांत या तरुणावर सिंह-सिंहिणीचा हा तिसरा हल्ला असल्याचं बोललं जात आहे. आश्‍चर्य म्हणजे दरवेळी त्याच ठिकाणी भावेशवर हल्ला होतो.(Lion Attack)

गेल्या तीन वर्षांत या तरुणावर सिंह-सिंहिणीचा हा तिसरा हल्ला असल्याचं बोललं जात आहे. आश्‍चर्य म्हणजे दरवेळी त्याच ठिकाणी भावेशवर हल्ला होतो.(Lion Attack)

अहमदाबाद 14 ऑगस्ट : गुजरातमधील अमरेली येथील सावरकुंडला तालुक्यातील अंबार्डी गावात शनिवारी एका सिंहिणीने तरुणावर हल्ला केला. भावेश भारवाड नावाचा हा तरुण गावाच्या शिवारात गुरे चारत होता. यादरम्यान सिंहीणीने अचानक त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या चेहऱ्यावर आणि हातावर जखमा झाल्या आहेत. त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून सावरकुंडला येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, या तरुणाबद्दल वेगळीच माहिती समोर आली, जी कोणालाही थक्क करणारी आहे.

समोर फणा काढून उभा राहिला खतरनाक कोब्रा, तरुणीने केलं किस; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

TOI नुसार, भावेशने याने आरडाओरड करायला सुरुवात करताच सिंहीण त्याला सोडून जवळच्या शेतात पळाली. गेल्या तीन वर्षांत या तरुणावर सिंह-सिंहिणीचा हा तिसरा हल्ला असल्याचं बोललं जात आहे. आश्‍चर्य म्हणजे दरवेळी त्याच ठिकाणी भावेशवर हल्ला होतो.

अमरेली जिल्ह्यातील असुरक्षित भागात किमान 100 सिंह फिरत असले तरी जंगली प्राणी सहसा इथल्या लोकांना इजा करत नाहीत. या प्राण्यांचे पिल्ले अनेकदा गावामध्ये प्रवेश करत असतात. ते पाळीव आणि भटक्या गुरांचीही शिकार करतात. गीरच्या जंगलासह गुजरातमधील सौराष्ट्र प्रदेशातील काही भागात आशियाई सिंह आढळतात. जून 2020 च्या गणनेनुसार, गीर वनक्षेत्रात 674 सिंह होते, तर 2015 मध्ये त्यांची संख्या 523 होती.

Shocking Video : मुलाने चुकून ठेवला पाय; फणा काढलेल्या कोब्र्यापासून आईने लेकाला असं वाचवलं!

गेल्या महिन्यात गुजरातमधील अमरेली जिल्ह्यात सिंहाच्या हल्ल्यात एका 18 वर्षीय शेतमजुराचा मृत्यू झाला होता. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, भयदेश पायर तुलसीश्याम वनपरिक्षेत्रातील नानिधारी गावात जात असताना सिंहाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला ओढत जंगलात नेले. स्थानिक लोकांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली, त्यानंतर एक टीम तेथे पोहोचली आणि तरुणाचे अवशेष सापडले. काही वेळातच सिंहाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि सिंहाला जेरबंद करण्यात आले.

First published:

Tags: R gujarat lion, Shocking news