मराठी बातम्या /बातम्या /Viral /

समोर फणा काढून उभा राहिला खतरनाक कोब्रा, तरुणीने केलं किस; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

समोर फणा काढून उभा राहिला खतरनाक कोब्रा, तरुणीने केलं किस; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

कोब्रा सापाने फणा काढताच तरुणीने त्याला किस केलं.

कोब्रा सापाने फणा काढताच तरुणीने त्याला किस केलं.

जगातील खतरनाक सापांपैकी एक असलेल्या कोब्रा सापाला किस करण्याची डेअरिंग तरुणीने केली.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 12 ऑगस्ट : सापाला पाहिलं तरी आपल्याला घाम फुटतो.  त्याच्या जवळ जाणं तर दूरच राहिलं. पण काही लोक असे आहेत ज्यांच्यासाठी साप म्हणजे खेळणंच. सापासोबत खेळणाऱ्या काही लोकांचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. पण एका तरुणीने तर चक्क सापाला किस करण्याची हिंमत केली. हा साप साधासुधा नव्हे तर खतरनाक विषारी कोब्रा आहे. कोब्रा साप हा इतका भयंकर आहे की तो चावला तर की काही वेळातच त्याचा मृत्यू होऊ शकतो. अशा सापासमोर स्वतःच ही तरुणी गेली. फक्त त्याच्या जवळ गेलीच नाही तर त्याला किसही करू लागली. व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकी भरेल, घाम येईल आणि अंगावर काटाही येईल. व्हिडीओत पाहू शकता एका स्टेजवर एक भलामोठा किंग कोब्रा फणा काढून आहे. एक तरुणी त्याच्यासमोर बसली आहे. ती हळूहळू त्या सापाजवळ जाते. सापाच्या जवळ जाताच आपलं तोंड ती त्याच्या तोंडाजवळ नेते आणि त्याला किस करते. यावेळी आपल्या काळजाचं पाणी पाणी होतं. हे वाचा - Girl child kissing snake : Shocking! खतरनाक सापाला किस करायला गेली चिमुकली आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO पण सुदैवाने साप तिला काही करत नाही. त्यानंतर तिलाही जोश चढतो आणि ती सापाला पुन्हा पुन्हा किस करत राहते. पण तरी साप तिला काहीच करत नाही. इतक्या खतरनाक सापाने या तरुणीला काहीच कसं केलं नाही, असा प्रश्न तुम्हाला पडलं असेल.
तुम्ही नीट व्हिडीओ नीट पाहाल तर तिच्या हातात एक काळ्या रंगाचं कापडही आहे. ती तरुणी सापाचं लक्ष त्या कापडाकडे खेचण्याचा प्रयत्न करते आणि हळूहळू ती सापाजवळ जाते. सापाचं लक्ष त्या कापडाकडे आहे त्यामुळे तरुणी त्याच्याजवळ जाऊ शकते आणि त्याला किस करू शकते. तिने किस केल्यानंतरही सापाचं लक्ष त्या कापडाकडेच आहे. हे वाचा - I LOVE YOU म्हणत चक्क भल्यामोठ्या सापालाच KISS देत राहिली आणि...; VIDEO पाहून अंगावर काटा येईल तिची ही डेअरिंग, हिंमत पाहून तिथं उपस्थित सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. world_of_snakes_ इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
First published:

Tags: Snake, Snake video, Viral, Viral videos

पुढील बातम्या