Home /News /national /

गाडीचं चलन कापताच वीज कर्मचाऱ्याने घेतला विचित्र पद्धतीने बदला; पाहून पोलीसही चक्रावले

गाडीचं चलन कापताच वीज कर्मचाऱ्याने घेतला विचित्र पद्धतीने बदला; पाहून पोलीसही चक्रावले

एका घटनेत पोलिसाने चलन कापल्याने एका लाइनमॅनने अतिशय अजब पद्धतीने बदला घेतला (Lineman Snaps Police Station’s Power Supply). त्याने हरदासपूर पोलीस स्टेशनचा वीजपुरवठाच खंडित केला.

    लखनऊ 13 जून : जेव्हा एखादी व्यक्ती कागदपत्रांशिवाय रस्त्यावर वाहन चालवते तेव्हा ती वाहतूक पोलिसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. जेणेकरून दंडाचं चलन कापलं जाणार नाही. काही वेळा चलन कापल्यानंतर परवानाही जप्त केला जातो. परवाना परत मिळवण्यासाठी बरीच धावपळ करावी लागते. याच कारणामुळे ट्रॅफिक पोलीस हवालदाराशी सहसा कोणी पंगा घेत नाही. परंतु उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातून आता एक अजब प्रकार समोर आला आहे. VIDEO: वेट्रेसने रेस्टॉरंटमध्येच केली ग्राहकांची जबर धुलाई; नेमकं काय घडलं पाहा एका विचित्र घटनेत, उत्तर प्रदेशातील बरेली येथील एका घटनेत पोलिसाने चलन कापल्याने एका लाइनमॅनने अतिशय अजब पद्धतीने बदला घेतला (Lineman Snaps Police Station’s Power Supply). त्याने हरदासपूर पोलीस स्टेशनचा वीजपुरवठाच खंडित केला. शनिवारी रात्री पोलीस ठाण्याचा वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. वीज अधिकाऱ्यांनी आता या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रिपोर्टनुसार, पोलीस अधिकारी मोदी सिंह हे वाहन तपासणी मोहिमेवर असताना त्यांनी लाईनमॅन भगवान स्वरूप यांची दुचाकी थांबवली आणि आवश्यक कागदपत्रे दाखवण्यास सांगितलं. आपण कागदपत्रं सोबत ठेवत नाही, घरी जाऊन कागद आणू शकतो, असं स्वरूप म्हणाले. इन्स्पेक्टरने त्यांचं ऐकलं नाही आणि 500 ​​रुपयांचा दंड ठोठावला. काळ आला होता पण...; रस्त्यावर उभा असतानाच अंगावर आली भरधाव ट्रक, VIDEO चा शेवट थक्क करणारा यामुळे संतापलेल्या स्वरूपने असं कृत्य केलं की, ही घटना आता चर्चेत आली. चलन कापल्याने स्वरूप यांना इतका राग आला की त्यांनी विद्युत विभागातील सहकाऱ्यांना बोलावून पोलीस ठाण्यातील वीजपुरवठा खंडित केला. पोलीस ठाण्यातील वीजपुरवठ्याला मीटर नसल्यामुळे ते बेकायदेशीर असल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. या घटनेनंतर पोलीस कर्मचारीही हैराण झाले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. चलन कापल्यानंतर इलेक्ट्रिशियनने या अजब पद्धतीने बदला घेतल्याचं समोर आलं..
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Traffic department, Traffic police

    पुढील बातम्या