नवी दिल्ली, 27 जून : देशाची राजधानी दिल्लीमधील कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढत आहे. शुक्रवारी येथे सर्वाधिक 3460 नवीन रुग्ण आढळले आहेत. दिल्लीमध्ये 24 तासांच्या आत या संसर्गामुळे 63 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनाची एकूण प्रकरणे वाढून 77,240 झाली आहेत. तर त्याच वेळी, कोविड – 19 संसर्गामुळे 2492 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या एकूण रूग्णांच्या बाबतीत दिल्लीने मुंबईला खूप मागे सोडले आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारले 12 जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाबद्दल दिल्ली सरकारला फटकारले होते. दिल्ली सरकार कोरोना रूग्ण व मृतदेहाचे योग्य व्यवस्थापन करीत नाही. कोरोना रूग्णांना येथे प्राण्यांप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचेही कोर्टाने म्हटले होते. गेल्या तीन दिवसांत दिल्लीत दहा हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी पदभार स्वीकारल्यापासून दिल्लीत बरेच बदल झाले आहेत. दिल्लीत जास्तीत जास्त चाचण्यांद्वारे केंद्र सरकार कोरोना रुग्णांवर वेळेवर उपचार सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली की, आयसीएमआरने 4.7 लाख आरटी-पीसीआर चाचण्या करण्यासाठी दिल्ली सरकारला किमान साहित्य मोफत दिले आहे. हे वाचा- कोरोनाचा दुसरा टप्पा कसा असेल? लाखोंनी जाईल लोकांचे प्राण - WHO याशिवाय आयसीएमआरच्या वतीने दिल्ली सरकारला 50,000 रॅपिड एंटीजन टेस्ट किट्सदेखील विनामूल्य देण्यात आल्या आहेत. आजपासून दिल्लीत सेरोलॉजिकल सर्वेक्षण सुरू झाले. या सर्वेक्षणातून रक्ताचे नमुने घेऊन एन्टी बॉडी टेस्टिंग तपासणी केली जाईल. दिल्लीत कोरोना संक्रमणाचा प्रसार जाणून घेणे हा या सर्वेक्षणातील उद्देश आहे. असे म्हटले जात आहे की, दिल्ली सरकारने कोरोनाशी लढा देण्यासाठी कोणतीही तयारी केली नव्हती. रुग्णालयात काही सुविधा वाढविल्या गेल्या, परंतु येथे बेड्सची तीव्र कमतरता होती. दिल्लीत जवळपास 1 कोटी 90 लाख लोक राहतात, परंतु जूनच्या मध्यापर्यंत कोरोना रूग्णांसाठी फक्त 8 हजार बेड्स होती. हे वाचा- कोरोनावर इंजेक्शन निघालं, पण ते आपल्याला परवडणारं नाही; शरद पवारांचा मोठा खुलासा इथे निर्णय घेताना सरकारला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. अनेक रुग्णालये एमसीडी अंतर्गत चालतात, तर काहींवर थेट दिल्ली सरकारचे नियंत्रण असते. अशा परिस्थितीत येथे कोरोनाच्या नावाने राजकारणाची सुरूवात झाली आहे. याशिवाय दिल्लीतही आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. संपादन - मीनल गांगुर्डे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.