कोरोना विषाणूची दुसरी लहर आली किंवा कोरोनाचा कहर असाच वाढला तर यात कोट्यवधी लोकांचा मृत्यू होऊ शकतो असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. स्पॅनिश फ्लूचा संदर्भ देताना WHO चे सहायक महासंचालक रानेरी गुएरा म्हणाले की, सप्टेंबर-ऑक्टोबरच्या थंड वातावरणात साथीच्या आजाराची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा हाहाकार वाढले असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, आतापर्यंत जगभरात कोरोनाच्या 97.7 लाख प्रकरणं समोर आली आहेत. तर जगभरात कोरोना विषाणूमुळे 4.9 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
सुमारे 100 वर्षांपूर्वी आलेल्या स्पॅनिश फ्लूच्या दुसर्या टप्प्यात कोट्यवधी लोकांना आपला जीव गमावण्याची वेळ आली होती. स्पॅनिश फ्लूही कोव्हिडप्रमाणेच होता. त्यावेळीही उन्हाळ्यात आजाराची प्रकरणं कमी होती, परंतु नंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
त्याआधी, युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुख क्रिस्टीन लगार्डे यांनी शुक्रवारी सांगितलं की, 1918-19 च्या स्पॅनिश फ्लूपासून खूप काही शिकलो आहे आणि तशीच कोरोनाची दुसरी लाट नक्कीच भयानक असणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार जास्त उष्णतेमध्ये कमी होतो, पण त्याचा अर्थ कोरोना थांबला असा नाही. त्यामुळे थंडी सुरू झाल्याचा याचा आणखी एक प्रकोप पाहायला मिळेल.