जाहिरात
मराठी बातम्या / देश / IAS Tina Dabi Pregnant : लातूरची सून देणार Good News; IAS अधिकारी टीना डाबी होणार आई!

IAS Tina Dabi Pregnant : लातूरची सून देणार Good News; IAS अधिकारी टीना डाबी होणार आई!

IAS-Tina-Dabi

IAS-Tina-Dabi

IAS Tina Dabi Pregnant : कधी होणार डिलिव्हरी?

  • -MIN READ Rajasthan
  • Last Updated :

जैसलमेर, 30 जून : जैसलमेरची प्रसिद्ध जिल्हा कलेक्टर टीना डाबीच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत टीना डाबींना नऊ महिने पूर्ण होऊ डिलिव्हरी होण्याची माहिती आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आपल्या कामाच्या आणि लग्नाच्या वृत्तामुळे टीना डाबी चर्चेत असतात. सध्या प्रेग्नेंन्सीचं वृत्त समोर आल्यानंतर त्यांना जयपूरमध्ये नॉन फिल्ड पोस्टिंग मिळावी यासाठी राज्य सरकारकडे अर्ज केला आहे. पुढील काही दिवसात त्या मॅटर्निटी लिव्हवर जाणार आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांनी लातूरचे प्रदीप गावंडे यांच्यासोबत लग्न केलं होतं. यानंतर त्यांना लातूरची सून म्हणूनही ओळखलं जात आहे. काही दिवसांपूर्वी त्या आपल्या जिल्ह्यातील विस्थापिक पाकिस्तानी नागरिकांना भेटायला गेल्या होत्या. तेव्हा त्या गर्भवती असल्याचं समोर आलं होतं. दुसरीकडे टीना डाबी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी राज्य सरकारकडे नॉन फिल्ड पोस्टिंगसाठी अर्ज केला आहे. येत्या काही दिवसात त्या मॅटर्निटी लिव्हवर जाणार असल्या तरी प्रकृती काळजी घेता त्यांनी आताच नॉन फिल्ड पोस्टिंगचा अर्ज दाखल केला आहे. IAS टीना दाबी पुन्हा चर्चेत, जैसलमेरमधल्या त्या निर्णयामुळे वाद येत्या २ ते ३ दिवसात येणाऱ्या लिस्टनुसार त्या ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत ट्रान्सफर लिस्ट येत नाही तोपर्यंत त्या जैसलमेरच्या कलेक्टर म्हणून काम करतील. दुसरीकडे त्यांनी जैसलमेरहून जयपूरला शिफ्ट होण्याची सर्व तयारी केली असून सामानाचं पॅकिंगही झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात