नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर: देशाची राजधानी दिल्लीत (Delhi Crime News) एक धक्कादायक घटना घडली आहे. जिम (Gym trainer) ट्रेनरवर गोळ्या झाडली आहे. दिल्लीच्या मॉडेल (Model Town area of Delhi) टाऊन परिसरात ही घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे आंतरजातीय (inter-caste marriage) विवाह केल्यानं हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.
देवी सिंह उर्फ देवा असं हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेनंतर देवाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
हेही वाचा- T20 World Cup, IND vs NZ: टीम इंडियाला मोठ्या फरकानं कसं हरवलं? विल्यमसननं सांगितलं रहस्य
जुलै महिन्यात देवानं दुसऱ्या धर्माच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला. हाच राग मनात ठेवून मुलीच्या भावानं आपल्या मित्राच्या साथीनं देवावर गोळीबार केला आहे. या हल्ल्याची पोलिसांनी दखल घेतली आहे. पोलिसांनी मुलीचा आरोपी भाऊ याला अटक केली आहे. तसंच त्याच्याकडून दोन देशी पिस्तूल सुद्धा जप्त केली आहे.
या हल्ल्यात देवाच्या डोक्याला गोळी लागली आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्याच्या शालिमार बाग येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नुकतंच झालं आहे लग्न
देवाच्या नातेवाईकांनी सांगितलं की, जुलै 2021 मध्ये देवानं हिना नावाच्या मुलीसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला. आम्ही हिंदू आहोत तर हिना मुस्लिम आहे. लग्नानंतर दोघंही वेगळे राहत होते. देवा याची आदर्श नगरमध्ये जिम आहे. हिनाचा धाकटा भाऊ शाहनवाज आणि त्याचा एक मित्र काल त्याला भेटले आणि या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला.
हेही वाचा- मलिकांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांचा मोठा दावा, मागितली सुरक्षा
समोर आलेल्या माहितीनुसार, हिनानं तपासात पोलिसांना सांगितलं की, हिनाचा आरोपी भाऊ यानं देवाचा नंबर मिळवला आणि त्याला भेटायला बोलावलं. शनिवारी देवा हिनासोबत तिचा भाऊ शाहनवाज याला भेटायला गेले. त्यावेळी शाहनवाज याचा एक मित्र देखील होता. शाहनवाजनं देवाला मॉडेल टाऊनला घेऊन निघून गेले.
हिनाच्या जबाबानंतर पोलिसांनी शाहनवाज आणि त्याच्या एका मित्राला अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केलेत. आरोपी भावाला त्याच्या बहिणीनं आंतरजातीय विवाह केल्याचा राग होता. यातूनच त्याने देवावर प्राणघातक हल्ला केल्याचं हिनानं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Delhi