जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / ड्रग्सच्या अतिसेवनाने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांनीच पुरला मृतदेह आणि...

ड्रग्सच्या अतिसेवनाने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांनीच पुरला मृतदेह आणि...

ड्रग्सच्या अतिसेवनाने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांनीच पुरला मृतदेह आणि...

हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) या राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ड्रग्सचे अतिसेवन (Drugs Overdose) केल्याने एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. धीरज ठाकूर असे या मृत तरुणाचे नाव आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मंडी, 13 मे : हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) या राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ड्रग्सचे अतिसेवन (Drugs Overdose) केल्याने एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. धीरज ठाकूर असे या मृत तरुणाचे नाव आहे. हा मुलगा 26 एप्रिलपासून गायब होता. धीरजचा फोन स्विच ऑफ झाला अन् तो परत आलाच नाही - सरकारघाट परिसरातील थडू गावाचा रहिवासी 19 वर्षीय धीरज हा समीरपूर येथून आयटीआयचे (ITI) शिक्षण घेत होता. धीरचे वडील बलदेव सिंह यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या मुलगा व्यसनाच्या आहारी गेला होता. 26 एप्रिलला तो आयटीआय येथून निघाला होता. मात्र, घरी न येता तो पारूल रविंद्र कुमार (झड़ियार), विक्रांत (धगवानी) आणि जाहू येथील प्रिंस या त्याच्या मित्रांसोबत गेला. सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. घरच्यांना चिंता वाटू लागली. यामुळे त्याच्या वडिलांना त्याच्या मोबाईलवर फोन केला तर त्याने सांगितले की तो आपला मित्र पारुलच्या घरी आला आहे आणि तिथेच राहणार आहे. यानंतर धीरजचा फोन स्विच ऑफ झाला. फोन स्विच ऑफ झाल्यानंतर त्याचा फोन कधी परत आला नाही. त्याचा शोध घेऊन थकल्यानंतर त्याच्या वडिलांनी 30 एप्रिलला सरकारघाट पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केली आणि त्याच्या मित्रांवर संशय असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी धीरजचा मित्र असलेल्या पारुलच्या हालचालींवर नजर ठेवायला सुरुवात केली. पोलिसांनी जेव्हा त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने खरी माहिती दिली. पारुलने दिली धक्कादायक माहिती - पारुलने पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 26 एप्रिलला या सर्व मित्रांनी इंजेक्शनच्या माध्यमातून अमली पदार्थाचा डोस घेतला. धीरजने जास्त डोस घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. यानंतर आपल्या समोरच धीरजचा मृत्यू झाल्याने तिनही मित्रांची बोबडीच वळाली. त्यांना काय करावे ते सुचत नव्हते. यामुळे त्यांनी धीरजच्या मृतदेहाला एका पोत्यात बांधले आणि बकर खड्ड किनाऱ्यावर घेऊन आले. तिथे गढ्ढा खोदला आणि मृतदेहाला तिथे पुरले. यानंतर ते आपल्या घरी परतले. तर पोलिसांनी पारुलने दिलेल्या माहितीच्या आधारे जेव्हा त्या जागी जाऊन खोदले तेव्हा त्यांना धीरजचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळाला. यानंतर त्याला शवविच्छेदनासाठी नेरचौक येथील वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठवण्यात आला आहे. हेही वाचा -  विधवा सांगून केले लग्न, आठवड्याभरातच पैसे आणि दागिने घेऊन तरुणी फरार

सरकारघाटचे पोलीस उपअधीक्षक तिलक राज शांडिल्य यांनी या घटनेला दुजोरा दिला. तसेच त्यांनी सांगितले की, पारुलच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन अन्य मित्रांचीही चौकशी केली जात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर धीरजचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात