जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धक्कादायक! कोरोनामुळे शिवसेना नगरसेवकाचं निधन, ठाण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

धक्कादायक! कोरोनामुळे शिवसेना नगरसेवकाचं निधन, ठाण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

धक्कादायक! कोरोनामुळे शिवसेना नगरसेवकाचं निधन, ठाण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भाईंदर, 9 जून : कोरोनाची लागण झाल्यामुळे मीरा भाईंदरमधील शिवसेना नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांचं ठाण्याच्या वेदांत रुगणालयात निधन झालं आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आठवड्यापूर्वी नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांच्या आई, पत्नी आणि भाऊ यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये त्यांच्या पत्नीला डीचार्ज देण्यात आला होता तर भाऊ आणि आई या सध्या वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. हरिशचंद्र आमगावकर हे मीरा भाईंदर महानगरपालिकेतमध्ये दोन टर्म नगरसेवक होते. तर या अगोदर त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील भूषवले होते. सध्या ते महानगरपालिका शिवसेनेचे गटनेते म्हणून होते, तर आमदार प्रताप सरनाईक यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख होती. याबाबत आमदार प्रताप सरनाईक यांनी सोशल मीडीयावर कोरोनामुळे हरिशचंद्र आमगावकर यांचं निधन झाल्याचे नमूद करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: shivsena
  • First Published :
जाहिरात
जाहिरात