कोलकाता, 11 मे: केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते बाबुल सुप्रियो पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. कोलकाता पोलिसांनी बाबुल सुप्रियो यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ट्विटरवर बनावट फोटो शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी बाबुल सुप्रियोविरुद्ध ही कारवाई केली आहे.
एका वरिष्ठ पोलिस अधिकारीने सांगितले की, बाबुल सुप्रियो यांनी ट्विटरवर 8 मे रोजी एक फोटो शेअर केला होता. मुख्यमंत्री ममता बनर्जी यांचे बंधू कार्तिक बनर्जी यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव राजीव सिन्हा आणि काही जण मद्यसेवन करताना दिसत आहेत.
पोलिसांनी केवळ बाबुल सुप्रियो यांच्याविरुद्धच नाही तर बनावट फोटोला शेअर करणाऱ्या काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा..मातृदिनीच हरपलं मातृछत्र, एकुलत्या एक मुलीला घेता आलं नाही अंत्यदर्शन
This post circulating on social media is #Fake.The information shared in the message is false. A case has been started over this and legal action being taken.@KolkataPolice pic.twitter.com/Zh1Ea0W4gR
— DCP South Kolkata (@KPSouthDiv) May 10, 2020
'सिन्हासोबत मुख्यमंत्री ममता बनर्जी यांचा भाऊ कार्तिक बनर्जी आहे.', असं कॅप्शनही बाबुल सुप्रियो यांनी फोटोखाली लिहिले आहे. कोलकाता पोलिसांच्या साऊथ डिव्हिजनने ट्विटरवर बाबुल यांच्याद्वारा केलेला फोटो बनावट असल्याचा दावा केला आहे. एवढं नाही तर या प्रकरणी सुप्रियोंविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती.
हेही वाचा...धक्कादायक! मुंबईत सेलिब्रिटींची चिंता वाढली, केअरटेकरच निघाला कोरोना पॉझिटिव्ह
याबाबत पोलिसांनी एक ट्वीट केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट फेक असल्याचं म्हणलं आहे. फोटोसह दिलेली माहिती सपशेल खोटी आहे. याप्रकरणी बाबुल सुप्रियो यांच्याविरुद्ध कायदेशिर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबुल सुप्रियो हे आसनसोलचे भाजपचे खासदार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.