Home /News /national /

हे रॉकेट सायन्स नाही : आदर पुनावालांच्या कोरोना लसीबाबतच्या वक्तव्यावर AIIMS च्या संचालकांनी दिलं हे उत्तर

हे रॉकेट सायन्स नाही : आदर पुनावालांच्या कोरोना लसीबाबतच्या वक्तव्यावर AIIMS च्या संचालकांनी दिलं हे उत्तर

डॉ. गुलेरिया (Dr Guleria) यांनी म्हटलं आहे की, लसीच्या पुरवठ्याबाबत (Vaccine Supply) माहिती ठेवणं हे काही रॉकेट सायन्स नाही. लसीच्या उत्पादनाबाबत उत्पादकांनीच सर्व व्यवस्था करायची आहे.

नवी दिल्ली, 10 एप्रिल: सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (Corona Second Wave) थैमान घातल्यानं चाचण्यांबरोबर (Testing) लसीकरण मोहिमेचा (Vaccination Drive) वेग वाढवण्यावर सरकार भर देत आहे; मात्र अनेक राज्यांमध्ये या लशीचा तुटवडा निर्माण झाल्याचं वृत्त आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. त्यावरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. देशात निर्माण होणाऱ्या दोन लसीपैकी कोव्हीशील्ड या लसीचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टीट्यूट (Serum Institute) ही कंपनी करते. लसीचा पुरवठा अखंड ठेवण्यासाठी उत्पादन वाढवण्याची गरज असून, त्याकरता तीन हजार कोटी रुपये आणि तीन महिन्याचा कालावधी आवश्यक आहे, असं मत सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला (Adar Poonawala) यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी हे काही रॉकेट सायन्स (Rocket Science) नाही, अशी टिप्पणी केली आहे. डॉ. गुलेरिया यांनी म्हटलं आहे की, लसीच्या पुरवठ्याबाबत (Vaccine Supply) माहिती ठेवणं हे काही रॉकेट सायन्स नाही. लसीच्या उत्पादनाबाबत उत्पादकांनीच सर्व व्यवस्था करायची आहे. फक्त देशालाच नव्हे तर जगभरातील पुरवठ्याबाबत त्यांना माहिती आहे. लसीची मागणी सतत सुरू आहेच. सहा महिने आधीपासून लसीची मागणी वाढती राहणार असल्याची कल्पना सगळ्यांना होती, त्यामुळे आता असं म्हणणं की, उत्पादन वाढवण्यासाठी तीन महिने लागतील हे थोडं विचित्र आहे.’ वर्षभराने पुण्याने अनुभवली तीच स्तब्धता; गडबजलेली मंडई, लक्ष्मी रस्ता झाला शांत ते पुढं म्हणाले की, मी आर्थिक बाबतीत सल्ला देऊ शकत नाही; पण मला खात्री आहे की असे अनेक गुंतवणूकदार असतील जे लस निर्मितीत मदत करायला तयार असतील. संपूर्ण जगाला लसीची गरज आहे, त्यामुळे मागणी प्रचंड आहे. सध्या 50 वेगवेगळ्या लसींच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. कारण लोक याकडे फक्त मानवतेच्या भावनेतून नाही तर व्यावसायिकदृष्ट्या बघत आहेत.’ महाराष्ट्रात आतापर्यंत 97 लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण महाराष्ट्रात लसीचा तुटवडा निर्माण झाल्यावरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आतापर्यंत 97 लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण झाल्याची माहिती एका अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. यानुसार शुक्रवारी राज्यात जवळपास तीन लाख लोकांचे लसीकरण करण्यात आलं आणि शुक्रवारपर्यंत राज्यात लसीचे दहा लाख डोस शिल्लक होते.आज शनिवारीकेंद्राकडून 4.59 लाख डोस प्राप्त झाले असल्याचंही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान,बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) शुक्रवारी सांगितलं की दहा आणि अकरा एप्रिल रोजी मुंबईत केवळ सरकारी आणि सिव्हिक केंद्रांवरच लसीकरण केलं जाईल. खासगी रुग्णालयांमध्ये लस दिली जाणार नाही. लसीचा आणखी साठा मिळाल्यावर खासगी रुग्णालयामध्ये लसीकरण सुरू होईल,असंही पालिकेनं स्पष्ट केलं. नियम सर्वांसाठी सारखे; कोरोनाच्या गाईडलाईन्स मोडणाऱ्या पंतप्रधानांना लाखोंचा दंड केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं(Health Ministry)शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार,देशात आतापर्यंत 9कोटी 80 लाखांहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. काल रात्री आठ वाजता मिळालेल्या आकडेवारीनुसार 9 कोटी 80 लाख 75 हजार 160 लोकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये 89 लाख 87 हजार 818 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस तर 54 लाख 78 हजार 562 आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 98 लाख 65 हजार 504 आघाडीवरील कर्मचाऱ्यांना पहिला तर 46 लाख 56 हजार 236 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. याशिवाय 45 ते 59 वर्षे वयोगटातील 2 कोटी 81 लाख 30 हजार 126 लोकांना पहिला डोस तर 5 लाख 79 हजार 276 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरण मोहिमेच्या 84 वा दिवशी शुक्रवारी देशात रात्री आठ वाजेपर्यंत 32 लाख 16 हजार 949 लोकांचे लसीकरण करण्यात आलं. त्यामध्ये 28 लाख 24 हजार 66 जणांना पहिला डोस तर 3 लाख 92 हजार 883 लोकांना दुसरा डोस देण्यात आला.
First published:

Tags: AIIMS, Corona vaccination, Corona vaccine

पुढील बातम्या