नियम सर्वांसाठी सारखेच; कोरोनाच्या गाईडलाईन्स मोडणाऱ्या पंतप्रधानांना लाखोंचा दंड

नियम सर्वांसाठी सारखेच; कोरोनाच्या गाईडलाईन्स मोडणाऱ्या पंतप्रधानांना लाखोंचा दंड

कोरोना गाईडलाईन्सचे (Corona Guidelines)पालन केले नाही म्हणून एखाद्या देशाच्या पंतप्रधानांना (Prime minister) दंड झाल्याचे आपण कधी ऐकले नसेल. परंतु,अशी घटना नुकतीच घडली आहे.

  • Share this:

मुंबई 10 एप्रिल: जगातील अनेक देशांमध्ये सध्या कोरोनाने (Corona) धुमाकूळ घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी काही देशांमध्ये कडक निर्बंध,लॉकडाऊनसारख्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अशी स्थिती असतानाही अनेकदा नागरिकांकडून निर्बंधांचे उल्लंघन होताना पाहायला मिळते. कोरोना प्रतिबंधासाठी असलेल्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून नागरिकांना दंड केल्याचे आतापर्यंत आपण अनेकदा पाहिले. परंतु, कोरोना गाईडलाईन्सचे (Corona Guidelines)पालन केले नाही म्हणून एखाद्या देशाच्या पंतप्रधानांना (Prime minister) दंड झाल्याचे आपण कधी ऐकले नसेल. परंतु,अशी घटना नुकतीच घडली असून कोरोना गाईडलाईन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी नॉर्वेच्या पंतप्रधानांना दंड भरावा लागला आहे.

नॉर्वेच्या (Norway)पंतप्रधान एर्ना सोलबर्ग (Prime Minister Erna Solberg) यांनी कोरोना गाईडलाईन्सचे म्हणजेच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नॉर्वे पोलिसांनी त्यांना 1.75 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एर्ना सोलबर्ग यांनी आपला 60 वा वाढदिवस साजरा करताना कोरोना नियमांचं उल्लंघन केले. या कारणामुळे त्यांना 20,000 नॉर्वेजियन क्राऊन (Norwegian Crowns)इतका दंड आकारण्यात आला.

नॉर्वेजियन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पंतप्रधानांनी आपला वाढदिवस साजरा करण्याच्या उद्देशाने परिवारातील सदस्यांना एकत्र बोलावले. यावेळी कोरोना प्रतिबंधक नियमांचे कोणतेही पालन करण्यात आले नाही. एर्ना सोलबर्ग यांनी आपल्या वाढदिवसाच्या पार्टीला 13 लोकांना आमंत्रित केले होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे (Social Distancing)पालन करण्यात आले नाही. कोविड प्रोटोकॉलनुसार,कोणत्याही समारंभासाठी केवळ 10 लोकांना आमंत्रित करण्याची मर्यादा आहे,तसेच त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणेही गरजेचे आहे. मात्र या पार्टीत याच नियमांचं उल्लंघन झाले होते.

नॉर्वेचे पोलिस प्रमुख ओले सेवरुड यांनी सांगितले की अनेक घटनांमध्ये पोलिस दंड आकारत नाहीत. मात्र पंतप्रधान हे देशाचा चेहरा असतात. त्यांनीच या नियमांची घोषणा केलेली आहे. कायदा सर्वांसाठी सारखाच आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यानं पंतप्रधानांना दंड आकारणे योग्यच आहे. सोशल डिस्टन्सिंग आवश्यक असून,त्याचे पालन न केल्यास दंड आकारला जाऊ शकतो,असा संदेश या कारवाईच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत जाईल. दुसऱ्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान झालेल्या सोलबर्ग यांनी फेब्रुवारीत एका रिसॉर्टमध्ये आपल्या 60 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुटुंबातील 13 सदस्यांसह एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यानंतर त्यांनी याबाबत माफी देखील मागितली आहे.

First published: April 10, 2021, 8:06 PM IST

ताज्या बातम्या