Home /News /national /

Explainer: संसदेच्या कामकाजाच्या LIVE प्रसारण कसं सुरू झालं? वाचा रंजक प्रवास

Explainer: संसदेच्या कामकाजाच्या LIVE प्रसारण कसं सुरू झालं? वाचा रंजक प्रवास

Parliament Live Proceedings: संसदेत चालणारं काम आज आपण घरात बसून पाहू शकतो पण हा पूर्ण प्रवास नेमका कसा होता हे जाणून घेऊ या...

नवी दिल्ली, 3 मार्च: लोकसभा (Loksabha) आणि राज्यसभेच्या (Rajyasabha) कामकाजाचं थेट प्रसारण पाहण्यासाठी काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या लोकसभा टीव्ही (Loksabha TV) आणि राज्यसभा टीव्ही (Rajyasabha TV) या दोन चॅनेल्सचं विलीनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या दोन्ही चॅनेल्सचं विलीनीकरण करून संसद टीव्ही (Sansad TV) असं एकच चॅनेल सुरू ठेवण्यात येणार आहे; पण संसदेचं कामकाज नागरिकांना घरी बसून पाहता येण्यासाठीच्या या सोयीचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता? द इंडियन एक्स्प्रेसने आपल्या वृत्तात हा प्रवास उलगडला आहे. सोमनाथ चॅटर्जींची कल्पना लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही या दोन चॅनेल्सपैकी आधी लोकसभा टीव्ही हे चॅनेल सुरू झालं. 24 जुलै 2006 रोजी त्याचं प्रसारण सुरू झालं. देशातल्या प्रत्येक घरापर्यंत लोकसभेच्या कामकाजाचं थेट प्रसारण पोहोचवण्याच्या उद्देशानं ते सुरू करण्यात आलं होतं. 'संसद भवनात सुरू असलेलं खासदारांचं काम पाहून नागरिकांमध्ये त्या कामजाविषयी जागरूकता निर्माण होते, तसंच प्रशासनाच्या प्रक्रियेतल्या विविध घटकांचे कष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचतात. या माहितीमुळे लोकांना त्यांचे लोकशाहीतील अधिकार डोळसपणे वापरण्याची शक्ती मिळते आणि ते सशक्तपणे लोकशाही व्यवस्थेचा भाग बनतात,' असं लोकसभा टीव्हीच्या वेबसाइटवर लिहिलेलं आहे. लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी (Somnath Chatterji) यांच्या कल्पनेतून लोकसभा टीव्ही या चॅनेलची निर्मिती झाली. त्या वेळच्या घडामोडींचे साक्षीदार असलेले लोक सांगतात, की राज्यसभेचे तत्कालीन अध्यक्ष भैरोसिंह शेखावत यांना चॅटर्जी यांचा प्रस्ताव मान्य नव्हता. शेखावत यांच्यानंतर राज्यसभा अध्यक्ष (म्हणजे उपराष्ट्रपती) झालेले हमीद अन्सारी यांच्या काळात स्वतंत्र राज्यसभा टीव्हीची कल्पना प्रत्यक्षात (2011) आली. चॅनेल्स सुरू होण्यापूर्वी लोकसभा टीव्ही हे चॅनेल सुरू होण्यापूर्वी संसदेच्या कामकाजातला निवडक भाग टीव्हीवरून प्रसारित केला जायचा. त्याची सुरुवात 20 डिसेंबर 1989 रोजी झाली. उदाहरण सांगायचं झालं, तर वर्षातल्या पहिल्या अधिवेशनावेळी दोन्ही सदनांचं संयुक्त सत्र होतं, त्या वेळी होणारं राष्ट्रपतींचं अभिभाषण प्रसारित केलं जाई. लोकसभेच्या कामकाजाचं संपूर्ण चित्रीकरण करण्याची प्रक्रिया 18 एप्रिल 1994 पासून सुरू झाली. त्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात संसदेत लो पॉवर ट्रान्स्मीटर बसवण्यात आले आणि कामकाजाचं थेट प्रसारण करण्याच्या उद्देशाने ते सुरू करण्यात आले. डिसेंबर 1994पासून दोन्ही सदनांमधला प्रश्नोत्तरांचा तास दूरदर्शनवर एक आड एक आठवड्यात थेट प्रसारित केला जायचा.

अवश्य वाचा -   BBC च्या रेडिओ शोमध्ये एका कॉलरने पंतप्रधान मोदींच्या आईबद्दल वापरले अपशब्द

'अशी व्यवस्था करण्यात आली होती, की एका सदनातल्या प्रश्नोत्तराच्या तासाचं थेट प्रसारण दूरदर्शनवर होत असेल, तर त्याच वेळी दुसऱ्या सदनातल्या प्रश्नोत्तराच्या तासाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरून व्हायचं,' अशी माहिती लोकसभेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. डीडी न्यूज चॅनेल सुरू झाल्यानंतर दोन्ही सदनांतल्या प्रश्नोतरांच्या तासाचं थेट प्रसारण एकाच वेळी दूरदर्शनच्या दोन वेगवेगळ्या चॅनेल्सवर केलं जाऊ लागलं. त्यानंतर दशकभरात तंत्रज्ञानात मोठी सुधारणा झाली. दोन्ही सदनांच्या कामकाजाचं थेट प्रसारण करण्यासाठी डिसेंबर 2004मध्ये स्वतंत्र सॅटेलाइट चॅनेलची निर्मिती करण्यात आली. 2006 मध्ये लोकसभा टीव्हीवरून लोकसभेच्या कामकाजाचं (Loksabha Proceedings) थेट प्रसारण (Live Telecast) होऊ लागलं. राज्यसभा टीव्ही 2011मध्ये राज्यसभा टीव्ही हे चॅनेल सुरू झालं. राज्यसभेच्या कामकाजाच्या थेट प्रसारणाबरोबरच त्या चॅनेलवर संसदेतल्या विविध घडामोडींचं विश्लेषणही दाखवलं जाऊ लागलं. त्याबद्दलची वेगवेगळी माहिती पुरवणारं व्यासपीठ म्हणून ते चॅनेल विकसित झालं. हे चॅनेल पाहणाऱ्यांची संख्या लक्षणीय असून, त्या कॅटेगरीतल्या सर्वांत पाहिल्या जाणाऱ्या चॅनेल्सपैकी ते एक होतं. एम. व्यंकय्या नायडू 2017मध्ये उपराष्ट्रपती (राज्यसभेचे अध्यक्ष) बनले, तेव्हा राज्यसभा टीव्हीच्या यू-ट्यूब व्ह्यूअर्सची संख्या 4.6 लाख होती. आता ती 50 लाख झाली आहे. राज्यसभा टीव्हीचं तंत्रज्ञान लोकसभा टीव्हीच्या तुलनेत आधुनिक असलं, तरी त्याचं बजेट लोकसभा टीव्हीच्या तुलनेत कमी आहे. या दोन्ही चॅनेल्ससाठी केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाते. लोकसभा टीव्ही चॅनेलमध्ये सुमारे 110 कर्मचारी असून, लोकसभा टीव्ही चॅनेलमध्ये सुमारे 250 कर्मचारी काम करतात.
First published:

Tags: India, Loksabha, Parliament, Rajyasabha, Sansad loksabha

पुढील बातम्या