नवी दिल्ली, 3 मार्च :BBC च्या एशियन नेटवर्कच्या एका रेडिओ शो मध्ये फोन इन कार्यक्रमात एका कॉलरने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले. BBC Asian Network’s Big Debate नावाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला.
एशियन नेटवर्क या बीबीसीच्या चॅनेलवर बिग डिबेट (BBC big debate) नावाचा कार्यक्रम घेतला जातो. एखाद्या विषयावर नागरिकांना त्यांचे विचार मांडायचं व्यासपीठ यातून दिलं जातं. ब्रिटनमध्ये हा रेडिओ शो चालतो आणि त्याचं वेबसाइटवरदेखील प्रसारण होतं. या शोमध्ये एका कॉलरने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांच्याबद्दल वाईट शब्द वापरले.
या रेडिओ शोचा VIDEO आणि लिंक ट्विटरवर (BBC Twitter handle) शेअर झाल्यानंतर अनेक नागरिकांनी ती पाहिली आणि त्याबद्दल आक्षेप नोंदवला. या कॉलरने वापरलेल्या भाषेवर संताप व्यक्त करण्यात आला. अशा प्रकारचं वक्तव्य रेडिओवर प्रसारण कसं करू शकतात, या शोच्या अँकरने याविषयी काही आक्षेप कसा नाही नोंदवला, तिने हस्तक्षेप करून कॉलरला थांबवायला हवं होतं. अशा अर्थाच्या कमेंट्स ट्विटर यूजर्सनी नोंदवल्या आहेत.
Did anyone hear the whole show ? pic.twitter.com/W1R1J8lndC — Sunny Johal (@DatchetTrainMan) March 1, 2021
काही जणांनी या प्रकारच्या निंदनीय भाषेबद्दल BBC ने माफी मागावी, अशी मागणीही केली आहे.
Would the BBC like to apologise for not vetting people before they are allowed on their programmes? Such language is not becoming for what used to be a respectable institution.
— Kiran BILAKHIA (@BilakhiaKiran) March 2, 2021
या रेडिओ शोमधून कॉलरची आक्षेपार्ह कमेंट वगळण्यात आलेली नाही. हा शो बीबीसी वेबसाइटवरही उपलब्ध आहे.
हे वाचा- मोदींच्या Make In India वर अमेरिका नाराज; हे आहे नापसंतीचं कारण
ब्रिटनमधल्या शीख आणि भारतीयांविरोघात होणाऱ्या वांशिक भेदभावाबद्दल चर्चा करणारा विषय या डिबेट शो मध्ये घेण्यात आला होता. चर्चेता सूर दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर घसरला आणि त्याच दरम्यान एका कॉलरने पंतप्रधानांबद्दल आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले.
मोदी सरकारने मांडलेल्या कृषी सुधारणा कायद्यांना विरोध म्हणून काही शेतकरी रस्त्यावर उतरून गेले दोन महिने आंदोलन करत आहेत. 26 जानेवारीला दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं. त्यानंतर हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BBC, BJP, India, International, Modi government, Narendra modi, Reality show