जाहिरात
मराठी बातम्या / देश / मंत्र्याची थेट संविधानावर बेधुंद टीका; म्हणे, 'घटनेनंच कामगारांच्या लुटीचा मार्ग मोकळा केला...'

मंत्र्याची थेट संविधानावर बेधुंद टीका; म्हणे, 'घटनेनंच कामगारांच्या लुटीचा मार्ग मोकळा केला...'

मंत्र्याची थेट संविधानावर बेधुंद टीका; म्हणे, 'घटनेनंच कामगारांच्या लुटीचा मार्ग मोकळा केला...'

आम्ही आंधळेपणाने ब्रिटीश व्यवस्थेची नक्कल करून राज्यघटना लिहिली.

  • -MIN READ
  • Last Updated :

थिरुवनंतपुरम, 5 जुलै : केरळचे सांस्कृतिक मंत्री साजी चेरियान (Kerala Minister Saji Cheriyan) यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Kerala Minister Controversial Statement) मागच्या 75 वर्षांत कामगार वर्गाला लुटण्यास मदत केल्याचे सांगून त्यांनी भारतीय संविधानावर टीका केली. (Saji Kuriyan on Indian Constitution) काय म्हणाले केरळचे मंत्री - ते म्हणाले की, आम्ही आंधळेपणाने ब्रिटीश व्यवस्थेची नक्कल करून राज्यघटना लिहिली. मात्र, संविधान शोषणाविरुद्ध कधीही संरक्षण देत नाही. संविधानामुळे सामान्य माणसाला आणि कामगार वर्गाला लुटण्यास मदत होते, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. केरळच्या पठानमथिट्टा जिल्ह्यातील मल्लापल्ली येथे सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) ने आयोजित कार्यक्रमाला त्यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. सांस्कृतिक मंत्री साजी चेरियन पुढे म्हणाले, “आम्ही अनेकदा म्हणतो की हे एक सुंदर संविधान आहे. पण आपण आंधळेपणाने ब्रिटीश व्यवस्थेची नक्कल करून राज्यघटना लिहिली. हे शोषणाविरुद्ध कधीही संरक्षण देत नाही. हे सामान्य माणसाला आणि कामगार वर्गाला लुटण्यास मदत करते.” हेही वाचा -  लज्जास्पद घटना! भाजपच्या महिला खासदाराचं सामान गेस्ट हाऊसबाहेर फेकलं, अंतर्वस्त्रांचाही समावेश, Video व्हायरल ते पुढे म्हणाले, “संविधान सुशोभित करण्यासाठी इकडे तिकडे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता यांची सांगड घालण्यात आली. मात्र, शोषक भाग अगदी स्पष्ट आहे. आम्ही 75 वर्षे अभिमानाने व्यवस्थेचे पालन केले, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. राज्यपालांनी मागवला तपशील -  आता केरळच्या मंत्र्याच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मंत्र्यांकडून दिलेल्या भाषणाचा तपशील मागवला आहे. तर मुख्यमंत्री विजयन यांनीही मंत्र्यांकडून अहवाल मागवला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी मंत्री साजी चेरियान यांनी “संविधानाचा अपमान” केल्याबद्दल मंत्रिपदावरून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना केली आहे. त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते व्ही. डी. साठेसन यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात