भोपाळ, 5 जुलै : मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) सागर जिल्ह्यात भाजपच्या नवनिर्वाचित महिला खासदारांसोबत एक लज्जांस्पद घटना घडली आहे. भाजपच्या महिला खासदार सुमित्रा वाल्मिकी (MP Sumitra Valmiki) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये त्या PWD च्या कर्मचाऱ्यांना फटकारताना दिसत आहे, ज्यांनी सर्किट हाऊसच्या खोलीतून त्यांचे सामान बाहेर फेकले. या घटनेमुळे खासदार संतप्त झाल्या असून त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलच फैलावर घेतलं. याप्रकरणी भोपाळमध्ये त्यांनी तक्रार दाखल केल्याचेही त्यांना सांगितले. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजप सरकारच्या राज्यातच भाजप खासदाराला अशा घटनेला सामोरे जावे लागल्याने ही घटना दुदैवी मानली जात आहे. रविवारी सागर येथे वाल्मिकी समाजाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये राज्यसभा खासदार सुमित्रा वाल्मिकी यांनीही सहभाग घेतला होता. आश्चर्याची बाब म्हणजे या कार्यक्रमाला आलेल्या सुमित्रा यांचे स्वागत करण्यासाठी भाजपचा एकही नेता पोहोचला नाही. सुमित्रा यांना रुम क्रमांक 3 देण्यात आला होता. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या गेल्या होत्या. मात्र, परत आल्यानंतर त्यांना त्यांचे सामान खोलीबाहेर पडलेले दिसले. अमरावतीनंतर उदयपूरमध्येही NIA ला मोठं यश; वसीम नावाच्या आरोपीला अटक ..म्हणून सामान बाहेर काढले ही खोली एका मंत्र्याला देण्यात आली होती, त्यामुळे सुमित्रा यांचे सामान बाहेर ठेवण्यात आले होते, असे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सुमित्रा येथे प्रोटोकॉल कोण पाहत आहे, असे विचारताना दिसत आहे. खासदार सुमित्रा विचारत आहे, की “त्यांचे सामान कोणी उचलले आणि फेकले. त्यात अंतरवस्त्रे देखील होती."
सागर में भाजपा सांसद सुमित्रा वाल्मीकि का घोर अपमान :
— Aashutosh Chouksey (Aashu) (@AASHU_NSUI) July 4, 2022
भाजपा के ही घमंडी मंत्री के आगमन का सम्मान करने के लिए अफसरों ने सुमित्रा वाल्मीकि का सामान गेस्ट हाउस के बाहर फेंक दिया।
शिवराज जी,
भाजपा ऐसे महिलाओं का सम्मान करती है...? pic.twitter.com/q6RdnEdwtb
एखाद्या मंत्र्याला खोली दिली, त्याचा अर्थ असा नाही की, त्यांचे सामान उचलून फेकून द्यावे, असे सुमित्रा म्हणाल्या, महिला अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सामान उचलले गेले तर ठीक होते. पण, पुरुषांनी ते ठेवले आहे. या प्रकरणी मी भोपाळमध्ये तक्रार केल्याचेही सुमित्रा वाल्मिकी व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत. यानंतर आता कोणावर कारवाई होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.