जाहिरात
मराठी बातम्या / देश / पहिल्या ट्रान्सजेंडर बॉडी बिल्डरला बनायचं होतं मिस्टर इंडिया, विष प्राशन करून संपवलं जीवन

पहिल्या ट्रान्सजेंडर बॉडी बिल्डरला बनायचं होतं मिस्टर इंडिया, विष प्राशन करून संपवलं जीवन

पहिल्या ट्रान्सजेंडर बॉडी बिल्डरला बनायचं होतं मिस्टर इंडिया, विष प्राशन करून संपवलं जीवन

मिस्टर केरळ म्हणून विजयी झाल्यानंतर प्रवीणने मिस्टर इंडियामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

तिरुवनंतपुरम, 05 मे : केरळमधील पहिला ट्रान्सजेंडर बॉडीबिल्डर प्रवीण नाथने आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीणने विष प्राशन करून जीवन संपवलं. सध्या पोलिस प्रवीणच्या आत्महत्येमागच्या कारणाचा शोध घेत आहेत. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. नाथने याच वर्षी व्हॅलेंटाइन डेला त्याच्या ट्रान्सजेंडर पार्टनरसोबत लग्न केलं होतं. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये बिनसल्याचं सोशल मीडियावरून समोर आलं होतं. दोघांमध्ये काही कारणांनी वाद असल्याची चर्चा होती. मात्र, नाथने अशा चर्चा फेटाळून लावल्या होत्या. रोनाल्डोच्या प्रतिस्पर्धी क्लबकडून मेस्सीला मोठी ऑफर, प्रस्ताव स्वीकारल्यास होणार विक्रम   प्रवीण नाथला मिस्टर केरल ट्रान्स मेन अशा नावाने ओळखलं जात होतं. ट्रान्सजेंडरमधून बॉडी बिल्डिंग करणारा तो पहिलाच होता. प्रवीणने २०२२ मध्ये मुंबईत आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंगच्या अंतिम फेरीतही भाग घेतला होता. मिस्टर केरळ म्हणून विजयी झाल्यानंतर प्रवीणने मिस्टर इंडियामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. प्रवीण मुळचा नेनमारा, पलक्काडमधील एलावनचेरी इथला आहे. प्रवीण आणि ट्रान्सवुमन रिशाना ऐशू यांच्याबाबत अनेक चर्चा समोर आल्या होत्या. त्यात रिशानासोबतचं नातं प्रवीण तोडणार असल्याचंही म्हटलं जात होतं. आता त्याच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा याची चर्चा सुरू झालीय. याच नात्यातून त्याने त्रस्त होऊन आत्महत्या केली का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात