Home /News /national /

Coronavirus विरुद्धच्या लढाईचं झालं होतं कौतुक, पण आता कुठे फसला 'केरळ पॅटर्न'?

Coronavirus विरुद्धच्या लढाईचं झालं होतं कौतुक, पण आता कुठे फसला 'केरळ पॅटर्न'?

केरळमध्ये नवीन Covid-19 रुग्णांची संख्या पुन्हा वाढते आहे. भारतात कोरोनाशी लढताना सर्वात यशस्वी ठरलेला केरळ पॅटर्न कुठे फसला?

    थिरुवनंतपुरम, 16 ऑक्टोबर : भारतात आतापर्यंत Coronavirus मुळे एक लाखाहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. नवे कोरोनारुग्ण सापडण्याचं सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात होतं. आंध्रप्रदेश  आणि कर्नाटकमध्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पण गेले दोन दिवस केरळमध्ये सर्वाधिक प्रमाणात नवे रुग्ण सापडत आहेत. भारतात कोरोनाशी लढताना सर्वात यशस्वी ठरलेला केरळ पॅटर्न कुठे फसला? केरळ राज्याने आतापर्यंत या महासाथीला आटोक्यात ठेवण्यात यश मिळवलं होतं. पण या पॅटर्नमध्ये कोणती चूक झाली?  केरळमध्ये 30 जानेवारी 2020 ला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर 29 जानेवारी ते 28 जुलैपर्यंत राज्यात दररोज 10 हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्याचबरोबर मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा संख्या वाढत असून केरळमध्ये एकाच दिवसात 11,755  केस सापडल्या आहेत. 7 ऑक्टोबरला केरळ देशातील सर्वाधिक रुग्ण सापडणारे चौथे राज्य म्हणून समोर आले आहे. कसा मिळवलं होतं नियंत्रण? जगभरात कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर जगभरातले भारतीय मायदेशी परतू लागले. मनीऑर्डर इकॉनॉमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमध्ये परदेशातून परतणाऱ्यांची संख्याही मोठी होती. पण प्रत्येक बाहेरून आलेल्या नागरिकाची तपासणी, कोविड रुग्णांना संसर्ग कुठून झाला हे शोधणं आणि कंटेन्मेंट झोनची कडक उपाययोजना यामुळे केरळमध्ये ही साथ पसरली नाही. केरळमध्ये 30 जानेवारीला पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर आणखी तीन केस समोर आल्यानंतर 9 मार्चपर्यंत राज्यात एकही कोरोना केस आढळून आली नव्हती. त्यानंतर 9 मे ते 7 जुलैदरम्यान प्रवासाला परवानगी दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात कोरोना केस आढळून आल्या होत्या. 6 जुलै ते 16 ऑगस्ट या काळात राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आलं होतं. त्याला वेगवेगळी कारणं होती. 6 सप्टेंबरपासून ते 26 सप्टेंबरपर्यंत केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट म्हणजेच जवळपास १ लाख झाली आहे. यामध्ये 371 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर 27 सप्टेंबर पासून 10 ऑक्टोबरपर्यंत राज्यात 1 लाख नवीन रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 7 ऑकटोबर या एकाच दिवशी 10 हजारांहून अधिक रुग्ण सापडले होते. परंतु सकारात्मक गोष्ट म्हणजे यामध्ये 13 ते 14 टक्के रुग्णच पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर ओणमदरम्यान केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला, असंही सांगितलं जातं केरळमध्ये मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि त्यांच्या सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री विजयन म्हणाले, "कोरोनाचा प्रसार कितपत थांबवू शकू हे सांगता येत नाही पण मृत्युदर मात्र आपण आटोक्यात आणू शकतो किंवा कमी करू शकतो." भारतात देखील सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. कोरोनावर राज्यांना सल्ला देणाऱ्या समितीचे आणि राज्य योजना बोर्डाचे सदस्य डॉ. इकबाल यांना रुग्णसंख्येमध्ये घट होणे सकारात्मक आहे का? विचारले असता त्यांनी असं म्हणणं घाईचं होईल असं म्हटलं आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus, Kerala

    पुढील बातम्या