तिरुवनंतरपुरम, 8 मार्च : भारतात कोरोनाव्हारच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. केरळात पुन्हा कोरनाव्हायरससने शिरकाव केला आहे. एकाच कुटुंबातील 5 जणांना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 39 झाली आहे. केरळच्या आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळात कोरोनाव्हायरसचे 5 रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी तिघं जण इटलीला गेले होते. भारतात परतल्यानंतर ते आपल्या 2 नातेवाईकांच्या संपर्कात आले होते. ज्या मूळ 3 रुग्णांना कोरोनाव्हायरसची लागण झाली ते पठ्ठणमथित्ता (Pathanamthitta) चे रहिवासी आहे. दाम्पत्य आणि त्यांच्या मुलाचा समावेश आहे.
Total positive cases of #Coronavirus in the country rises to 39 https://t.co/7rGWznHaM8
— ANI (@ANI) March 8, 2020
त्यानंतर केरळच्या आरोग्य विभागानं सूचना जारी केली आहे. ज्या विमानातून या कुटुंबानं प्रवास केला होता. त्या विमानातील प्रवाशांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. व्हेनिका ते डोहा कतार एअरवेज फ्लाइट 126 ने प्रवास केला आणि त्यानंतर डोहा ते कोची त्यांनी फ्लाइट 514 ने ते केरळात पोहोचले. संबंधित - ‘डान्स अगेन्स्ट द व्हायरस’, ‘कोरोना’पासून वाचण्यासाठी पाहा हा Video याआधी केरळात कोरोनाव्हायरसचे 3 रुग्ण सापडले होते, जे विषाणूची लागण झालेले भारतातील पहिले रुग्ण होते, जे चीनच्या वुहानहून भारतात आले होते. हे तिन्ही रुग्ण आता बरे झालेत. जगभरात कोरोनाव्हायरसने 3,586 जणांचा बळी घेतला आहे. तर एक लाखापेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे. कोरोनाचे रुग्ण जिथे होते ती इमारतच कोसळली, 6 जणांचा मृत्यू शनिवारी चीनच्या गुआंगझौ शहरात हॉटेलची इमारत कोसळली. सरकारी माध्यमांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूची लागण झालेल्या संशयित व्यक्तीला वेगळं ठेवण्यासाठी या हॉटेलचा वापर केला जात होता. इथल्या अधिकृत माध्यमांच्या माहितीनुसार, फुझियान प्रांतामधील 80 खोल्यांच्या हॉटेलची इमारत स्थानिक वेळ संध्याकाळी 7.30 च्या सुमारास कोसळली. त्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही काही जण ढिगाऱ्याखाली अडकलेत. संबंधित - तुम्हाला कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसली तर… काय करायचं, कुठे जायचं जाणून घ्या