मराठी बातम्या /बातम्या /देश /कर्नाटकला आजपासून मिळाले नवे मुख्यमंत्री; कशी होती बसवराज यांची राजकीय कारकीर्द

कर्नाटकला आजपासून मिळाले नवे मुख्यमंत्री; कशी होती बसवराज यांची राजकीय कारकीर्द

कर्नाटकचे (Karnataka) गृहमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री (New CM) म्हणून शपथ घेतली आहे.

कर्नाटकचे (Karnataka) गृहमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री (New CM) म्हणून शपथ घेतली आहे.

कर्नाटकचे (Karnataka) गृहमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री (New CM) म्हणून शपथ घेतली आहे.

बंगळुरू, 28 जुलै: कर्नाटकचे (Karnataka) गृहमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री (New CM) म्हणून शपथ घेतली आहे. मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) आमदारांच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी मुख्यमंत्री पदासाठी बसवराज बोम्मई यांच्या नावाची घोषणा केली. बोम्मई यांचा मुख्यमंत्री होण्याचा प्रस्ताव स्वतः मावळते सीएम बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी बनवला होता.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात तीन जाणांची उपमुख्यमंत्री पदावर नियुक्ती केली जाऊ शकते. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर. अशोक, गोविंद करजोल आणि बी. श्रीरामलू यांची उपमुख्यमंत्री पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. आर अशोक हे येडियुरप्पा यांच्या प्रशासनात महसूलमंत्री होते. तर गोविंद करजोल हे आधीपासूनच उपमुख्यमंत्री होते. तसेच श्रीरामलू कर्नाटक सरकारमध्ये समाज कल्याण मंत्री होते.

हेही वाचा-Explainer: आसाम-मिझोराम वादाचं मूळ कशात? काय आहे ब्रिटीश कनेक्शन?

शपथविधी सोहळ्यापूर्वी बसवराज बोम्मई म्हणाले की, अरविंद बेलाड आणि मुरुगेश निरानी हे माझे चांगले मित्र आणि सहकारी आहेत. आम्ही एक संघ म्हणून काम करू. लिंगायत व्होट बँकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोम्मई म्हणाले की- 'आम्ही एक राष्ट्रीय पक्ष आहोत आणि सर्व समुदायांना बरोबर घेऊन काम करायचं आहे. राज्यातील आर्थिक दूर करण्यावर माझा जोर असणार आहे. कारण राज्यातील आर्थिक असमानता दूर झाली, तर राज्यातील अन्य सर्व समस्या आपोआप सुटू शकतात. सर्व समुदायांचा विकास झाला पाहिजे आणि राज्याची भरभराट व्हावी, हीच माझी इच्छा आहे.

हेही वाचा-धक्कादायक! येडियुरप्पांच्या राजीनाम्यामुळे नाराज युवकाची आत्महत्या

जनता दलापासून राजकीय कारकीर्द सुरू केली

बसवराज बोम्मई यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात जनत दल पक्षातून केली होती. बोम्मई हे लिंगायत समाजाचे असून कर्नाटकात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर आहे. बोम्मई हे येडियुरप्पा यांचे अगदी निकटचे सहकारी मानले जातात. ते येडियुरप्पा यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री देखील राहिले आहेत. विशेष म्हणजे बसवराज बोम्मई यांचे वडील एसआर बोम्मई यांनी देखील कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. बसवराज यांनी 2008 साली भाजपात प्रवेश केला होता. यानंतर त्यांची राजकीय वाटचाल वेगानं झाली.

First published:

Tags: Karnataka, New cm