बंगळुरु, 6 मे: दीड महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊनमुळे समाजातील सर्व घटकातील लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातीस जनतेसाठी 1,610 कोटी रुपयांच्या 'कोरोना व्हायरस विशेष आर्थिक पॅकेज'ची घोषणा करण्यात आली आहे.
राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालक, विणकर, धोबी, नाई, बांधकाम कामगारांना बेरोजगार भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिली आहे.
हेही वाचा.. …आणि त्या माऊलीला ‘News18 लोकमत’च्या वृत्तानं परत मिळालं गहाण ठेवलेलं मंगळसूत्र!
सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील शेतकरी, फुले उत्पादक, वॉशरमेन, ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालक, एमएसएमई, मोठे उद्योग, विणकर, इमारत बांधकाम कामगार आणि सलुन व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोबतच कर्नाटक सरकारने एक्साइज ड्यूटीमध्ये 11 टक्क्यांनी वाढ केली आहे. दरम्यान अर्थ संकल्पात 6 टक्के एक्साइज ड्यूटी जाहीर करण्यात आली होती.
लॉकडाऊनमुळे उत्पादनांच्या मागणीअभावी फुलांच्या उत्पादकांनी त्यांची शेतातील फुले नष्ट केली आहेत. सुमारे 11,687 हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी फुलांची लागवड केली होती. फुल उत्पादकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने पिकाच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 25000 रुपये नुकसान भरपाईची घोषणा केली.
कोरोना व्हायरसचा सलून, लॉन्ड्री व्यावसायिकांही मोठा फटका बसला आहे. शहरातीच नाही तर ग्रामीण भागातील नागरिकांना मोठी आर्थिक झळ सोसावी लाहत आहे. कर्नाटक सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजनुसार राज्यातील सुमारे 2 लाख 30 हजार न्हावी आणि जवळपास 60 हजार लॉन्ड्रीचालकांना नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी 5000 रुपये मदत देण्यात येईल. त्याचबरोबर राज्यातील 7 लाख 75 हजार ऑटो व टॅक्सी चालकांना 5000 रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
हेही वाचा.. राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय, आरोग्य विभागात 25 हजार जणांची भरती करणार
काय आहेत सरकारच्या घोषणा...?
-कर्नाटक सरकारने 1,610 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले...
-रिक्षा आणि टॅक्सी चालक, विणकर, धोबी, नाई, बांधकाम कामगारांना बेरोजगार भत्ता
- कर्नाटक सरकारने रद्द केल्या मजुरांसाठीच्या विशेष ट्रेन
-असंघटीत आणि हातावर पोट भर भरणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकाला 5,000 रुपये
-फुल उत्पादकांना पिकाच्या नुकसानीसाठी 25,000 रुपये
-सलून आणि धोबी व्यवसायिकांना प्रत्येकी 5,000 रुपये
-हातमाग विणकरांना 2,000 रुपये
-बांधकाम कामगारांना 5,000 रुपये
-एमएसएमई उद्योगांसाठी वीज बिल दोन महिन्यांसाठी माफ