मराठी बातम्या /बातम्या /देश /कडक सॅल्यूट! 9 महिन्यांची गरोदर नर्स करतेय 6 तास काम, आराम सोडून सुरू आहे कोरोना रुग्णांची सेवा

कडक सॅल्यूट! 9 महिन्यांची गरोदर नर्स करतेय 6 तास काम, आराम सोडून सुरू आहे कोरोना रुग्णांची सेवा

शिवमोगा इथं राहणाऱ्या रूपा राव यांच्या या कर्तव्याला सलाम केला जात आहे.

शिवमोगा इथं राहणाऱ्या रूपा राव यांच्या या कर्तव्याला सलाम केला जात आहे.

शिवमोगा इथं राहणाऱ्या रूपा राव यांच्या या कर्तव्याला सलाम केला जात आहे.

शिमोगा, 12 मे : कोरोनाच्या संकटात सध्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार योध्या प्रमाणे काम करत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता, लोकांची सेवा करत आहेत. कोरोनाच्या संकटात या कोरोना योध्यांना दिवसरात्र काम करावं लागत आहे. अशा परिस्थितीत एक 9 महिन्यांची गरोदर नर्स आराम न करता, 6 तास ड्यूटी करत आहेत.

9 महिन्यांच्या या गरोदर नर्स सध्या कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला असला तरी त्या 6 तास काम करत आहेत. यामुळे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी ही त्यांचं कौतुक केलं आहे.

रुग्णांची सेवा करण्याची इच्छा

शिवमोगा इथं राहणाऱ्या रूपा राव यांच्या या कर्तव्याला सलाम केला जात आहे.गजानुरू गावात राहणाऱ्या रूपा रोज रुग्णांची सेवा करण्यासाठी थिरथाहल्लीच्या सरकारी रुग्णालयात येतात. रुग्णालयातील इतर कर्मचारी त्यांना पाहून हैराण होतात. मात्र रूपा न थकता, न थांबता रुग्णांची सेवा करतात. वरिष्ठ डॉक्टरांनी रूपा यांना सुट्टी घेण्याचा सल्ला दिला होता, मात्र त्यांनी आराम करण्याऐवजी रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला.

रोज करतात 6 तास काम

ANIशी बोलताना रूपा यांनी सांगितले की त्या रोज 6 तास काम करतात. त्यांनी सांगितले की, "या सरकारी रुग्णालयात आजूबाजूच्या गावातील लोक येतात. त्यामुळं लोकांना माझी गरज आहे. माझ्या वरिष्ठांनी मला सुट्टी घेण्यास सांगितले होते. मात्र मला लोकांची सेवा करायची आहे". अशा या कर्तव्यदक्ष कोरोना वॉरियर्सना सलाम.

हे वाचा - Corona रुग्णांचा मृत्यू कसा झाला? आता डॉक्टरांना कारण द्यावं लागणार

हे वाचा - ना औषध ना लस, 23 दिवसांच्या बाळानं फक्त आईच्या दूधानं कोरोनाला हरवलं

First published: