बंगळुरु, 19 मे : देशात सध्या कोरोना व्हायरसमुळे (coronavirus) गंभीर परिस्थिती आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लादले आहे. देशातील बहुतेक नागरिक हे सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊन (lock down) सहन करत आहेत. कर्नाटक (Karnataka) राज्य देखील त्याला अपवाद नाही. कर्नाटक सरकारने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानं राज्यातील जिल्हांर्गत प्रवासावर निर्बंध घातले आहेत. राज्य सरकारच्या या आदेशाला मुख्यमंत्र्यांच्या मुलानंच (Chief Minster Son) हरताळ फासला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुराप्पा (BS Yediyurappa) यांचे पुत्र बी.वाय. विजेंद्रा (BY Vijayendra) यांनी राज्य सरकारचे निर्बंध मोडत नांजुनागुड येथील श्रीकंटेश्वर मंदिराचे (Srikanteshwara temple, Nanjangud) दर्शन घेतल्याचं वृत्त आहे. विजेंद्र यांच्या पत्नी देखील यावेळी उपस्थित होत्या. कर्नाटक सरकारने आवश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवांवर बंदी घातली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे 24 मे पर्यंत राज्यात कडक लॉकडाऊनचा आदेश मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिला आहे. या काळात सर्व धार्मिक स्थळं देखील बंद ठेवण्यात येणार आहेत. या बंदीच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मुलानेच नियम मोडून मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानं त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. ‘निराश अवस्थेत पक्ष सोडणार होतो, पण…’ नितीन गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल, पब, बार बंद ठेवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. अन्नधान्य, औषधं, दूध, फळं, भाजीपाला याची दुकाने सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर राज्यामध्ये सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, क्रीडा, शैक्षणिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाला 24 मे पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने जाहीर केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.