मराठी बातम्या /बातम्या /देश /

'निराश अवस्थेत पक्ष सोडणार होतो, पण...' नितीन गडकरींनी सांगितला 'तो' किस्सा

'निराश अवस्थेत पक्ष सोडणार होतो, पण...' नितीन गडकरींनी सांगितला 'तो' किस्सा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मनात भाजपा सोडण्याचा विचार आला होता. स्वत:  गडकरींनीच एका कार्यक्रमात तो किस्सा सांगितला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मनात भाजपा सोडण्याचा विचार आला होता. स्वत: गडकरींनीच एका कार्यक्रमात तो किस्सा सांगितला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मनात भाजपा सोडण्याचा विचार आला होता. स्वत: गडकरींनीच एका कार्यक्रमात तो किस्सा सांगितला आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 19 मे: नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील प्रमुख नेते आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) स्वयंसेवक असलेले गडकरी संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरचे खासदार आहेत. ते सध्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री (union road transport minister and highway minister) आहेत. तसंच यापूर्वी ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील होते. कट्टर भाजपा कार्यकर्ते असलेल्या गडकरींच्या मनात देखील पक्ष सोडण्याचा विचार आला होता. स्वत: गडकरींनीच एका कार्यक्रमात तो किस्सा सांगितला आहे.

काय म्हणाले गडकरी?

नितीन गडकरींनी देशातील वेगवेगळ्या विद्यापीठींच्या कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा किस्सा सांगितला आहे. गडकरींनी या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, " मी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपामध्ये आलो होतो. ही 1980 च्या दशकातील गोष्ट आहे. अटलजी निवडणूक हरले होते. आमच्या पक्षाची अवस्था बिकट होती. मोठ्या पराभवानंतर अटलजी,अडवाणींना काही भविष्य नाही, भाजपाला काही आधार नाही, अशी टीका पत्रकार करत होते.''

अनेकांनी दिला सल्ला

गडकरींंनी 1980 च्या दशकातील घटनेचा उल्लेख करुन सांगितलं की, " मी तेव्हा खूप निशार झालो होतो. तुमचा पक्ष बरोबर नाही. त्यामुळे तुम्हाला या पार्टीत काही भविष्य नाही. लवकरात लवकर पक्ष बदला, असा सल्ला मला अनेकांनी दिला होता. मी काहीही झालं तरी पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. पण लोकं ज्या पद्धतीनं सल्ले देत ते ऐकल्यावर कधी - कधी त्यांचं मत बरोबर आहे, असंही वाटत होते." असं गडकरींनी यावेळी सांगितलं.

एका नेत्यामुळे बदललं आयुष्य

या निराश अवस्थेमध्ये आयआयटीमध्ये शिकलेल्या आणि सध्या अमेरिकेत राहणाऱ्या एका मित्राने मला पुस्तक दिले, त्या पुस्तकातील एका वाक्यानं आपलं आयुष्य बदलल्याचं गडकरींनी सांगितलं. अमेरिकेचे माजी अध्यक्ष रिचर्ड निक्सन (Richard Nixon) यांच्या आयुष्यावर आधारित ते पुस्तक होते.

'पंतप्रधान साहेब, खतांच्या किंमती कमी करा' प्रीतम मुंडेंचं थेट नरेंद्र मोदींना पत्र

निक्सन यांच्यावर त्यावेळी वॉटरगेट प्रकरणामुळे खूप टीका झाली होती. वॉशिंग्टनमध्ये स्थानिकांनी त्यांना जागा देण्यास देखील नकार दिला होता, अशी परिस्थिती होती. त्याच निक्सन यांच्या ' man is not finished when he is defeated. He is finished when he quits.'  या वाक्यानं आपल्याला प्रेरणा मिळाली, असं गडकरींनी सांगितले. माणूस कधीही युद्ध हरल्यानंतर संपत नाही, तो युद्धभूमी सोडते तेव्हा सोडतो, असा या वाक्याचा अर्थ आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला देखील हाच उपदेश केला होता. 'ही लढाई न्यायाची आहे. धर्माची आहे. कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तुला ती लढावीच लागेल. यामध्येच समाजाचे हित आहे. देशाचे हित  आहे. तुझ्या भविष्याचे हित आहे.' याच वाक्यानं पक्ष सोडण्याचा निर्णय बदलल्याचं गडकरी यांनी सांगितले.

First published:

Tags: BJP, Nitin gadkari