नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : भारतीय जनता पार्टीच्या दलित खासदाराला गावात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्याच्या एका गावातील ही घटना आहे. ए. नारायणस्वामी असं भाजप खासदाराचं नाव आहे. ए. नारायणस्वामी केवळ दलित असल्यानं त्यांना गावात येण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पावागाड़ा तालुक्यातील गोलारहट्टी गावातला हा प्रकार आहे. या घटनेबाबत भाजप खासदार ए. नारायणस्वामी यांनी सांगितले की, ते अधिकाऱ्यांसह गोला समुदायाच्या गोलारहट्टी गावात गेले होते. पण अनुसूचित जातीचा असल्यानं काही लोकांना त्यांना गावात प्रवेश करू दिला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. (वाचा : मी कधी तुरुंगात गेलो नाही, शरद पवारांची अमित शहांवर घणाघाती टीका)
Karnataka: Eyewitnesses say BJP MP A Narayanaswamy(in peach shirt) was denied entry by members of Yadava community at a village temple in Tumakuru, as he was Dalit. Nagaraj, a local says,"We've traditions,there is history of incidents,so people said he shouldn't be allowed"(16.9) pic.twitter.com/cq4dTveQCp
— ANI (@ANI) September 17, 2019
(वाचा : ‘मी पस्तावतोय, मुख्यमंत्र्यांविरोधात राष्ट्रवादीचे ‘पोस्टरवॉर’ ) मिळालेल्या माहितीनुसार, ए. नारायणस्वामी हे चित्रदुर्गचे खासदार आहेत. नारायणस्वामी गोलारहट्टी येणार असल्याची बातमी गावकऱ्यांना आधीच मिळाली होती. भाजप खासदार तेथे पोहोचण्यापूर्वीच काही लोक गावाबाहेर हजर होते. जसे नारायणस्वामी तेथे दाखल झाले तसं गावकऱ्यांनी त्यांना माघारी जाण्यास सांगितलं. गोलारहट्टी गावात कोणत्याही दलित किंवा खालच्या जातीतील व्यक्तीला प्रवेश करण्यास मनाई असल्याचं गावकऱ्यांनी त्यांना सांगितलं. यादरम्यान काही लोकांनी नारायणस्वामी यांना आपल्या घरात थांबवण्याची विनंती केली. पण यासही काही जणांनी कडाडून विरोध केला. (वाचा : ‘PM मोदींनी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत बोलणी केलीच नाही’ ) माझ्यामुळे वाद नकोत…. माझ्यामुळे गावात कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये, गावकऱ्यांमध्ये वाद होऊ नयेत, यासाठी गावाबाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं नारायणस्वामींनी सांगितलं. विधानसभेआधी पवार काका-पुतण्यात भगवा वाद? पाहा SPECIAL REPORT